घरCORONA UPDATEदिल्लीच्या बंगाली बाजारात आढळले कोरोनाचे ३ रुग्ण; बंगाली बाजार केला सील

दिल्लीच्या बंगाली बाजारात आढळले कोरोनाचे ३ रुग्ण; बंगाली बाजार केला सील

Subscribe

पोलिसांनी बंगाली बाजारात छापा टाकला. त्यावेळी बंगाली बाजाराच्या सर्व दुकानांमध्ये बरेच लोक अस्वच्छ परिस्थितीत राहत असल्याचं निदर्शनास आलं.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने २० भाग सील करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी रात्रीपासूनच या भागांना सील करण्याचं काम सुरू झालं आहे. बुधवारी रात्री दिल्लीचा बंगाली बाजार बंद करण्यात आला आहे. प्रशासन बंगाली बाजार बंद करत असताना बंगाली बाजारातील बंगाली पेस्ट्री दुकानाच्या छतावर ३५ लोक राहत असल्याचं आढळलं. प्रशासनाने या लोकांवर सामाजिक अंतरांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे. बंगाली पेस्ट्री शॉपच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा दंडाधिकारी यांनी बंगाली पेस्ट्री दुकानाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी बंगाली बाजारात छापा टाकला. त्यावेळी बंगाली बाजाराच्या सर्व दुकानांमध्ये बरेच लोक अस्वच्छ परिस्थितीत राहत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ केला जात आहे. दिल्ली पोलिसांनी बंगाली बाजाराचे सर्वेक्षण केलं होतं. ३२५ घरे आणि बंगाली बाजाराची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी बंगाली मार्केट क्षेत्रात तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

- Advertisement -

हेही वाचा – “… तुझे हातपाय मोडले असते”; पोलीस अधिकाऱ्याची आव्हाडांना धमकी


दिल्लीत कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण लक्षात घेता सरकारने दिल्लीच्या २० जागा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दक्षिण दिल्लीतील संगम विहार आणि मालवीय नगर या दोन भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केलं आहे. दिल्ली सरकारने दिल्लीकरांना मास्क घालूनच बाहेर पडणं अनिवार्य केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -