घरमुंबईउपमुख्यमंत्री अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी हॉस्पिलटमध्ये दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी हॉस्पिलटमध्ये दाखल

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मुंबईतील ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी थकवा व अंगात कणकण असल्याने ते होम क्वारंटाइन झाले होती. अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा करून आल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतरही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. मात्र, घरातून त्यांचे कार्यालयीन कामकाज सुरू होते.

लॉकडाउनच्या काळामध्ये अजित पवार यांनी आढावा बैठका तसेच राज्यातील कामकाजा संबंधी बैठकांचा धडाका लावला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः मातोश्रीमधून राज्याचा कारभार चालवत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मंत्रालयात दररोज न चुकता हजेरी लावत होते. तसेच विविध आढावा बैठक आहे ते घेत होते. त्याचप्रमाणे राज्यात विशेषत पश्चिम महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. अर्थात हे सर्व करत असताना कोरोणाची लागण होऊ नये यासाठी त्यांनी काटेकोरपणे दक्षता बाळगली होती. तोंडावर कायमस्वरूपी मास्क, हात सातत्याने सेनिटाईज करणे आणि लोकांची तसेच अधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांशी बोलताना, वावरतांना काटेकोरपणे सोशल डिस्टसिंग पाळणे, अशी काळजी अजित पवार कटाक्षाने घेत होते.

- Advertisement -

हेही वाचा –

भारताचा Recovery Rate चकीत करणारा; आतापर्यंत ७० लाख रुग्णांची कोरोनावर मात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -