घरटेक-वेकGoogle च्या कर्मचार्‍यांचे जून २०२१ पर्यंत Work From Home!

Google च्या कर्मचार्‍यांचे जून २०२१ पर्यंत Work From Home!

Subscribe

गुगलने आपल्या कर्मचार्‍यांसाठी केली मोठी घोषणा

आतापर्यंत जगभरात १ कोटी ६६ लाखांहूनही जास्त कोरोनाबाधित रूग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे, तर मृतांचा आकडा साडेसहा लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत ६ लाख ५५ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अशापरिस्थितीत अल्फाबेटच्या मालकीची कंपनी गुगलने आपल्या कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

गुगलने आपल्या कर्मचार्‍यांना जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरून काम करण्यास सांगितले आहे. गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी २०२१ च्या ३० जूनपर्यंत सर्व कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. सध्या कोरोना महामारीमुळे बर्‍याच कंपन्यांचे कर्मचारी घरीच असून घरून काम करणं पसंत करत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने प्रथम अहवाल दिला की जानेवारीमध्ये संपणारे वर्क फ्रॉम होम ऑप्शन जगभरातील सुमारे २००,००० गूगल कर्मचारी आणि कंत्राटदारांसाठी वाढविले जाऊ शकते. गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचार्‍यांना ३० जून २०२१ पर्यंत ईमेलमधून घरातून काम करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

गुगलने सोमवारी ही माहिती दिली असून गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी आपल्या कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, “कर्मचार्‍यांना त्यांच्या आगामी योजना निश्चित करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या वैश्विक काम करण्यासाठी असेलेले वर्क फ्रॉम होम हे ३० जून २०२१ पर्यंत वाढवित आहोत. हे अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांना प्रत्यक्ष ऑफिसला येऊन काम करण्याची आवश्यकता नाही.

गूगलच्या या सावधगिरीच्या निर्णयामुळे अशा निर्णयाची अंमलबजावणी इतर तंत्रज्ञान कंपन्या देखील करू शकतात. या निर्णयामुळे कोरोनाचा संसर्ग लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतो. ज्यावरून कोरोना लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यासह, अनेक टेक कंपन्यांनी असे म्हटले आहे की, ते येत्या काही दिवसात हळूहळू आपले कार्यालये पुन्हा सुरू करु शकतील अशी आशा आहे. दरम्यान, ट्विटरने म्हटले आहे की यामुळे सर्व कर्मचार्‍यांना घरातून अनिश्चित काळासाठी काम करण्याची मुभा देखील दिली जाणार आहे.


Corona Update: देशात २४ तासांत ४७,७०४ रूग्णांची नोंद; बळींनी ओलांडला ३३ हजारांचा टप्पा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -