घरदेश-विदेशLockDown- मुलाला खांद्यावर घेऊन त्याने केले ५०० किलोमीटरचे अंतर पार!

LockDown- मुलाला खांद्यावर घेऊन त्याने केले ५०० किलोमीटरचे अंतर पार!

Subscribe

लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने त्यांच्या कु्टुंबावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला होता

दयाराम कुशवाहा आणि त्यांची पत्नी ज्ञानवती हे दोघे दिल्लीत उंच इमारतींच्या बांधकामात वीट बनवण्याचे काम करतात. त्यांना ५ वर्षांचा लहान मुलगा देखील आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने त्यांच्या कु्टुंबावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला. २६ मार्च रोजी या दोघांसह काही लोकांनी दिल्लीवरून ५०० किलोमीटर पायी प्रवास करत आपले घर गाठले.

वयवर्ष २८ असणाऱ्या दयाराम यांनी आपल्या ५ वर्षाच्या मुलांला खांद्यावर घेऊन ५०० किमीचे अंतर पार केले. चार दिवस सतत पायी प्रवास केल्यानंतर ट्रकच्या मदतीने मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यातील जुगाया या गावी ते पोहोचू शकले.लॉकडाउननंतर दयाराम यांचे काम बंद झाल्याने परिवारासाठी जेवण आणि घऱ भाड्याची व्यवस्था करणे कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी आपले गाव गाठण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

दयारामने एका वृत्तसंस्थेशी बोलताना असे सांगितले की, असे नाही की दिल्लीमध्ये राहणं आवडत नाही किंवा कठिण आहे. परंतु आमच्या गावी रोजगार, पैसा असता त र आम्ही गावीच राहणं पसंत केलं असतं. दरम्यान दिल्लीवरून आपल्या गावी परतल्यानंतर त्यांना गावकऱ्यांनी परकेपणाची वागणुक दिली. कारण दिल्लीत सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण असल्याने त्यांना देखील कोरोनाची लागण झाली असावी, या हेतूने त्यांना दूर राहण्यास सांगितले.


LockDown: होमगार्ड जवानाला उठा-बश्यांची शिक्षा देणाऱ्या एएसआई अधिकाऱ्याला केलं निलंबित!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -