घरताज्या घडामोडीLockDown: होमगार्ड जवानाला उठा-बश्यांची शिक्षा देणाऱ्या एएसआई अधिकाऱ्याला केलं निलंबित!

LockDown: होमगार्ड जवानाला उठा-बश्यांची शिक्षा देणाऱ्या एएसआई अधिकाऱ्याला केलं निलंबित!

Subscribe

हा होमगार्ड नेहमी प्रमाणे कृषी अधिकाऱ्याच्या गाडीची तपासणी करीत होता. मात्र कृषी अधिकाऱ्याला हे अपमानास्पद वाटल म्हणून त्यांने होमगार्डवर दमदाटी करण्यास सुरुवात केली.

बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका कृषी अधिकाऱ्याची गाडी तपासणीसाठी थांबवली म्हणून होमगार्ड जवानाला उठा-बशा काढण्याची शिक्षा दिली. यावेळी उपस्थितीत असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोविंद सिंह यांना निलंबित करण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे कृषी विभागाने विभागीय कारवाई सुरू केली असून जिल्हा अधिकारीही याचा अधिक तपास करीत आहे. आज संध्याकाळपर्यंत कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नक्की काय घडलं?

अररिया जिल्ह्याचे कृषी पदाधिकारी मनोज कुमार एका भागातून जात असताना होमगार्ड गोनू तात्मा यांनी तपासणी करिता त्यांची गाडी थांबवली. लॉकडाऊन असल्यामुळे त्याने रुटीन तपासणीसाठी गाडी थांबवली होती. परंतु हा कृषी अधिकाऱ्याला अपमान वाटला. म्हणून त्यांनी आपला पदाचा धाक दाखवून त्यांचावर दमदाटी करून कान पकडून उठा-बशा काढायला सांगितल्या. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोविंद सिंह देखील उपस्थित होते.

- Advertisement -

या सर्व घटनेचा मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि २० सेकंदात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये त्याच्या दमदाटी केली जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसंच इतर बाजूचे लोक सर्व परिस्थिती बघत शांत उभे होते. व्हिडिओ कोणीतरी विचारत आहे की, तुम्ही यांना कसे काय थांबवू शकता? हे एक वरिष्ठ कृषी अधिकारी आहेत.

- Advertisement -

हा व्हिडिओ शेअर करताना एकाने लिहिलं आहे की, एका जवानाने अररियाच्या कृषी अधिकाऱ्यांकडे वाहन पास मागण्याची हिम्मत केली.


हेही वाचा – Viral Video: कॅनेडीयन पंतप्रधानांच्या ‘या’ स्टाईलवर नेटकरी फिदा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -