घरCORONA UPDATE'Covaxin' अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवर सर्वाधिक प्रभावी, अमेरिकच्या आरोग्य संघटनेचा दावा

‘Covaxin’ अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवर सर्वाधिक प्रभावी, अमेरिकच्या आरोग्य संघटनेचा दावा

Subscribe

भारत बायोटेकने विकसित केलेली ‘कोवॅक्सीन’ लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटला निष्क्रिय करत सर्वाधिक प्रभावी ठरत असल्याचा दावा अमेरिकच्या आरोग्य संघटनेने केला आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ संघटनेने हा दावा केला आहे.

अमेरिकन आरोग्य संघटनेने कोवॅक्सीन लस घेणाऱ्या नागरिकांच्या रक्तातील सीरमवर केलेल्या दोन संशोधनात असे आढळले की, कोवॅक्सीन लस शरीरात अँटीबॉडी तयार करण्याबरोबरचं SARS-CoV-2 च्या अल्फा आणि डेल्टाविरोधात अधिक प्रभावी ठरत आहे. या दोन्ही व्हेरियंटला कोवॅक्सिन लस निष्क्रिय करत आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन या लसीचे उत्पादन केंद्र सरकारद्वारे संचलित केलेल्या इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे विकसित केली जात आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर कोवॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये ही लस कोरोनाच्या लक्षणांवर (symptomatic disease) ७८ टक्के कार्यक्षम असल्याची माहिती समोर आली. तर कोरोनाच्या गंभीर लक्षणांविरोधात १०० टक्के प्रभावी ठरली आहे. तर कोरोनाचा संसर्ग झाला असताना मात्र लक्षणे न दिसणाऱ्या संसर्गावर ७० टक्के( asymptomatic infection) प्रभावी असल्याचे समोर आले.

तसेच अमेरिकन आरोग्य संघटनेने असेही नमूद केले की, कोरोनाविरोधात कोवॅक्सीन लस अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरली आहे. नुकताच कोवॅक्सीन लस निर्मात्यांनी लसीच्या अंतिम तिसऱ्या ट्रायलमधील परीक्षण डेटा तज्ज्ञांच्या पॅनेलसमोर सादर केला. या  ट्रायलमध्ये कोवॅक्सीन लस कोरोना विषाणूच्या लक्षणांविरोधात ७७.८ टक्के प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही लस ‘अत्यंत प्रभावी’ लस असल्याचे अमेरिकेच्या आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्याचबरोबर शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भारतात १६ जानेवारीपासून कोरोना विषाणू विरोधातील लसीकरण मोहिम सुरु झाल्यापासून कोवॅक्सीन आणि कोविशील्ड लसींचा वापर केला जात आहे. यात आता अमेरिकेच्या स्पुतनिक-वी लसीला भारतात आपतकालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. यासह येत्या काही दिवसांत फायझर आणि झेडस कॅडिला लसीला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -