घरमहाराष्ट्रनाशिकरेव्ह पार्ट्या टाळा, अन्यथा बंगलेमालकच होणार सहआरोपी

रेव्ह पार्ट्या टाळा, अन्यथा बंगलेमालकच होणार सहआरोपी

Subscribe

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा इशारा

इगतपुरीतील रेव्ह पार्टीप्रकरणानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. इगतपुरीसह जिल्ह्यात कोठेही रेव्ह पार्टीसह गैरप्रकारणांसाठी बंगले किंवा रिसॉर्ट भाड्याने देवू नयेत. बंगले किंवा रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टीसह गैरप्रकार आढळून आल्यास उपस्थित पुरुष, महिलांवर कडक कारवाई केली जाईल. शिवाय, रिसॉर्टमालक किंवा बंगलेमालकांना सहआरोपी केले जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे.

इगतपुरीतील स्काय ताज व्हील बंगल्यामध्ये आयोजित करण्यात आलेली रेव्ह पार्टी नाशिक ग्रामीण पोलिसांनी उधळली. यामध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री हिना पांचाळसह २५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून ड्रग्ज, चरस, गांजासह इतर अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. ड्रग्ज पुरवठा केल्याप्रकरणी पोलिसांनी नायझेरियन तरुणास मुंबईतून अटक केली आहे. रेव्ह पार्टीप्रकरणाचा तपास सुरु असताना दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. रेव्ह पार्टीत अनेक पुरुष व महिला पहिल्यांदाच ड्रग्जची नशा करताना आढळून आले आहेत तर अनेकजण ड्रग्जच्या आहारी गेल्याचेसुद्धा समोर आले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक जिल्हा नशेमुक्त होण्यासाठी कठोर पावले उचलले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्काय ताज व्हीलाच्या मालकास मुंबईतून अटक करत इगतपुरीत आणले आहे. जिल्ह्यात पुन्हा रेव्ह पार्टी होवू नये, यासाठी पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली आहे. इगतपुरीसह जिल्ह्यातील बंगलेमालक बंगले किंवा रिसॉर्ट भाड्याने देताना काळजी घ्यावी. बंगले किंवा रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टीसारखे गैरप्रकार होवू नये. आढळ्यास बंगमालकांना सहआरोपी करण्यात येईल, असाही इशारा पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे

तरुणाईने नशेच्या आहारी जावू नये. पालकांनी आपला मुलगा कोठे जातो, कोणाबरोबर जातो, याची माहिती ठेवावी. तरुण व तरुणी जसे संगत ठेवतात. त्यानुसार त्यांचे आयुष्य घडते. आयुष्य सुंदर ठेवण्यासाठी चांगली संगत ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -