घरदेश-विदेशTwitter च्या संकटात वाढ,‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ विरुद्ध दिल्ली पोलिसांनी केला ट्विटरवर गुन्हा दाखल

Twitter च्या संकटात वाढ,‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ विरुद्ध दिल्ली पोलिसांनी केला ट्विटरवर गुन्हा दाखल

Subscribe

ट्विटर (Twitter)विरुद्ध चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेंट विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे,हा गुन्हा राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या (NCPCR) तक्रारीवर आधारीत आहे.

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter)विरुद्ध चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेंट विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे,हा गुन्हा राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या (NCPCR) तक्रारीवर आधारीत आहे. NCPCR ने 25 जून रोजी ईमेलच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांच्या साइबर सेलमधील डीसीपी यांना तक्रार पाठवली होती. NCPCR ने आपल्या तक्रारीत या घटणेसंदर्भात वैधानिक अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि सांगितले आहे की  त्यांना बाल अश्लील सामग्री सोबतच अनेक गोष्टींची काळजी आहे.

ट्विटर वर POCSO ॲक्ट आणि IT ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी  NCPCR यांच्या तक्रारीवर करवाई करत वक्तव्य केलं आहे की, “दिल्ली पोलिस साइबर सेलने एनसीपीसीआर यांच्या तक्रारीच्या आधारे ट्विटर विरुद्ध पोक्सो ॲक्ट तसेच आईटी ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे,यामध्ये बाल शोषणशी संबंधित लिंक / सामग्री उपलब्धता यांची नोंद करण्यात आली आहे. तक्रार ट्विटर इंक आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्राइवेट लिमिटेड यांच्या विरुद्ध करण्यात आली आहे.”’

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल FIR नोंद

- Advertisement -

नुकतच ट्विटरवर भारत देशाचा चुकीचा तसेच विकृत नकाशा (याला नंतर बदलण्यात आले) दाखवण्यात आला होता. या नकाशात जम्मू आणि कश्मीर तसेच लद्दाख यांना भारत देशातील भागातून वगळण्यात आले होते. इतकेच नाही तर लद्दाखला चीनचा भाग दाखवण्यात आला होता तर, जम्मू-कश्मीरला एका स्वतंत्र देशामध्ये विभाजन करण्यात आले होते. या घटणेनंतर ट्विटर इंडिया एमडी मनीष माहेश्वरी विरुद्ध 29 जून रोजी वेबसाइटवर भारत देशाच्या नकाशाला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याने FIR दाखल करण्यात आली आहे. आता भोपाल साइबर सेलने सुद्धा 28 जून रोजी चुकीचा नक्शा दाखवल्याने ट्विटरच्या गलथान कराभाराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 505-2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईपीसीच्या प्रावधानमध्ये बोलण्यात आले आहे की एका व्यक्तिला तीन वर्षापर्यंत दंडात्मक कारवाई तसेच तुरूंवास भोगावा लागू शकतो जर तो कोणत्याही चूकीच्या रिपोर्टला प्रकाशित किंवा प्रसारित करत असणार ज्याने कोणत्याही समुदायात नाराजी, राग,द्वेशाची भावना निर्माण होत असणार .उत्तर प्रदेश पोलिसांनी मनीष माहेश्वरी विरूद्ध याच मुद्द्यावर आधिच गुन्हा नोंदवला आहे.



हे हि वाचा – conversion case in Kashmir:एका पीडीतेने केला विवाह,तर दोघींने स्वत:च्या मर्जीने केले होते धर्मांतरण

 



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -