घरताज्या घडामोडीCovid-19 लस घेताना Side effects बाबत चिंता ? लस घेण्याआधी 'ही' टेस्ट...

Covid-19 लस घेताना Side effects बाबत चिंता ? लस घेण्याआधी ‘ही’ टेस्ट कराच

Subscribe

भारतासह जगभरात सध्या covid-19 विरोधातील लस ही पुरेशा प्रमाणात अशी उपलब्ध आहे. विविध वयोगटासाठीचे कोरोना लसीकरण हे अनेक देशात सुरू झाले आहे. पण कोरोनाची लस घेतानाच अनेकांच्या मनात एकच प्रश्न घर करून आहे, तो म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतर कोणत्या रिएक्शन किंवा साईड इफेक्ट्स होऊ शकतात ? लसीकरण केंद्रावर कोरोनाची लस घेतल्यानंतर साधारणपणे १५ मिनिटांचे निरीक्षण करण्यात येते. या निरीक्षणाअंतर्गत तुम्हाला कोणतीही तत्काळ अशी घातक रिएक्शन होणार नाही, ही गोष्ट निरीक्षणाचा एक भाग आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर सर्वात सहजपणे समोर येणाऱ्या रिएक्शनमध्ये डोकेदुखी, ताप येणे, मरगळ वाटणे, अंगदुखी, सांधेदुखी तसेच लस घेतलेल्या जागी सूज येणे किंवा दुखू लागणे यासारखी एलर्जी समोर आली आहेत. counton2 या संकेतस्थळाने याबाबतची एक बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाबाबतची माहिती मांडण्यात आली आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यामध्ये सर्वाधिक जास्त चर्चा होते ती म्हणजे एनॅफिलिक्सची. लस घेतल्यानंतर ३० मिनिटात या रिएक्शन होण्याची शक्यता असते. महत्वाच म्हणजे या रिएक्शनवर उपचार घेणे शक्य आहे. अमेरिकेमध्ये the Centers for Disease Control and Prevention (CDC) ने केलेल्या अभ्यासानंतर अमेरिकेत प्रत्येक दहा लाख लोकांमध्ये दोन ते पाच लोकांना कोरोनाची लस घेतल्यानंतर रिएक्शन होते असे निदर्शनास आले आहे. अमेरिकेत चार्ल्स्टन एलर्जी एण्ड अस्थमामार्फत अशी घोषणा करण्यात आली की, कोरोनाची लस दिल्यानंतर त्याठिकाणी एलर्जी टेस्टिंग (चाचणी) करण्यात येईल. त्यामुळे जे लोक कोरोनाच्या लसीच्या बाबतीत चिंताग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी कोरोनाची चाचणी करण्यात येईल. अमेरिकेत कोरोनाविरोधात लसीकरणासाठी फायजर, मॉडर्ना आणि जॉन्सन एण्ड जॉन्सन या लसी देण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाची लस घेण्याआधीच त्याठिकाणी रिएक्शनच्या शक्यतेच्या पडताळणीसाठी एलर्जी टेस्ट करण्यासाठी अपॉईंटमेंट घेण्याचा पर्याय आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेण्याआधी एलर्जी टेस्ट करणे शक्य आहे.

- Advertisement -

लस घेण्याआधीच एलर्जी टेस्ट

एलर्जिस्ट आणि इम्युनोलॉजिस्ट यांनी आखलेल्या नव्या प्रोटोकॉल्समुळे आता कोरोनाच्या लसीकरणाआधीच एलर्जी टेस्ट करण्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीच्या एलर्जीशी संबंधित लक्ष घालणे शक्य होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. एलर्जी टेस्टमुळेच आता कोरोनाविरोधातील लस घेता येते की नाही याबाबतचा निर्णय अमेरिकेत शक्य होत आहे. अॅलर्जिस्टकडून स्किन प्रिक टेस्टिंग आणि इंट्राडर्मल टेस्टिंग या गोष्टींची चाचणी एलर्जी टेस्टमध्ये करण्यात येते. त्यामुळे एखाद्या रूग्णामध्ये कोरोनाच्या लशीमुळे एलर्जी होणारे घटक सापडतात का हे एलर्जी टेस्टमुळे शक्य होते.

कसा होतो लस घेण्याबाबतचा निर्णय ?

सद्यस्थितीला covid-19 विरोधातील लशीमुळे एलर्जिक रिएक्शन होतात की नाही याबाबतचे कोणतेही संशोधन समोर आले नाही. पण एलर्जीची चाचणी करून एलर्जीला कारणीभूत ठरणारे घटक पॉलिथिलीन, ग्लायकोल, पॉलिसॉर्बेट २०, पॉलिसॉर्बेट ८० यामुळे कोणतीही एनॅफिलेटिक रिएक्शन होऊ शकते याबाबतची पडताळणी करता येते. कोरोनाच्या लशीमुळे होणाऱ्या रिएक्शनमध्ये आतापर्यंत कोणतेही साम्य आढळलेले नाही. त्यामुळे रूग्णाच्या आरोग्याबाबतच्या इतिहासाच्या माध्यमातूनच कोरोनासाठीची लस घ्यायची की नाही याचा निर्णय एलर्जी टेस्टच्या माध्यमातून करण्यात येतो.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -