Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल ...तर सोडा पिल्याने जाऊ शकतो जीव

…तर सोडा पिल्याने जाऊ शकतो जीव

Related Story

- Advertisement -

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात बेकिंग सोडा असतोच. त्याला काही जण खाण्याचा सोडा देखील म्हणतात. अपचन झाल्यावर सोडा पाण्यात घालून पिण्याची अनेकांना सवय असते. परंतु जास्त प्रमाणात सोडा पिल्याने आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय गर्भवस्थेमध्ये आणि लहान मुलांसाठी सोडा चांगला नाही आहे. बेकिंग सोड्याच्या महत्त्वाची माहिती कॅनाडाई सोसायटी ऑफ इंटेस्टिनल रिसर्चकडून (Canadian Society Of Intestinal Research) मिळाली आहे.

बेकिंग सोडा एक अल्कधर्मी पदार्थ आहे, ज्याचा पोटातील अॅसिडवर परिणाम होता. विविध प्रकारे लोकं सोड्याचा वापर करतात. जेवणामध्ये देखील सोड्याचा वापर करतात. तसेच काही लोक अपचन झाल्यावर पावडरच्या रुपात किंवा पाण्यात घालून पितात. परंतु जास्त प्रमाणात बेकिंग सोडा पिणे आरोग्या घातक असते. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

सतत सोडाचा खाणे हे विषारी ठरू शकते. कारण यामध्ये सोडिअमचे प्रमाण जास्त असते. जेव्हा एखादा व्यक्ती जास्त प्रमाणात सोडिअम बायकार्बोनेट घेतो, तेव्हा उलट्या आणि अतिसार होतो.

बेकिंग सोडा आपल्या हृदयसाठी खूप धोकादायक आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले सोडियम हृदयावर हल्ला करते. २०१६ मधील एका अभ्यासात बेकिंग सोडाचा ओवरडोज केल्याने काही व्यक्तीच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. ओवरडोजमुळे Cardiac Attackची प्रकरणे देखील समोर आली आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे लहान मुलांना बेकिंग सोडा किंवा सोडियम बायकार्बोनेट युक्त औषधे दिले नाही पाहिजे.

बेकिंग सोड्यामुळे पोट फुटू शकते. जेव्हा बेकिंग सोडा अॅसिडसोबत मिक्स होते, तेव्हा एक रासायनिक प्रक्रिया होते. नॅशनल कॅपिटल पॉइजन सेंटर इशारा दिला आहे की, जर एखाद्या व्यक्तीने एकाच वेळेत अधिक प्रमाणात बेकिंग सोड्याचे सेवन केले तर पोटात मोठ्या प्रमाणात गॅस निर्मिती होती. यामुळे पोट फुटू शकते. विशेषतः जेव्हा व्यक्ती अधिक प्रमाण जेवतो आणि त्यानंतर दारू पितो. तेव्हा ही परिस्थितीत निर्माण होते.


हेही वाचा – उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण


 

- Advertisement -