घरCORONA UPDATEहवेतल्या कोरोना विषाणूंचा खात्मा हवेतच, CSIR कडून स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान उपलब्ध

हवेतल्या कोरोना विषाणूंचा खात्मा हवेतच, CSIR कडून स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान उपलब्ध

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याप्रमाणे भारतात देखील कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्याची प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला सर्वांच माहित आहे की, कोरोना विषाणू हा ड्रॉपलेसद्वारे पसरतो. पण जेव्हा आपण एखाद्या बंद खोलीत असतो तेव्हा त्या बंद खोलीच्या हवेत कोरोनाचा विषाणू असतो, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे बंद खोलीतील कोरोना विषाणूला मारण्यासाठी म्हणजेच तिथली हवा सॅनिटाइज करण्यासाठी काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR)ने एक तंत्र निर्माण केलं आहे. ज्याद्वारे हवेतील कोरोना विषाणूवर एअर स्ट्राईक केला जाईल. ते कसं काय ते समजून घ्या.

सध्या अनेक ठिकाणी एसी (AC) लावली जाते. जिथे एसी असते तिथे पूर्ण खोली बंद करावी लागते. संपूर्ण खोलीत फक्त एसीची हवा असते. आपण पाहिलं तर अनेक तज्ज्ञांनी थंड हवेच्या ठिकाणी आणि एसीद्वारे कोरोना विषाणूचा अधिक प्रसार होतो असं म्हटलं आहे. त्याच अनुषंगाने सीएसआयआरने हे तंत्रज्ञान निर्माण केलं आहे, जेणेकरून बंद खोलीमधील कोरोना विषाणू रोखता येईल आणि यामुळे त्या खोलीतील लोकांचा कोरोनापासून बचाव होईल. सीएसआयआरने हे तंत्र त्यांच्या ऑडिटोरीयममध्ये बसवलं देखील आहे. याबाबतचे वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे.

- Advertisement -

या नव्या तंत्रज्ञानाबाबत सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले की, ‘हे तंत्र खूप छोटेस असते. पहिल्यांदा हे बंद खोलीतील हवेला खेचून घेतं आणि ते एका पेपरवर आदळतं. जर या हवेमध्ये विषाणू असतील तर ते पेपर विषाणूला खेचून घेत.’ अशा पद्धतीने बंद खोलीतील हवेला सॅनिटाइज केलं जाते. हे तंत्रज्ञान व्यापक स्वरुपात इतरापर्यंत पोहोचण्यासाठी सीएसआयआरकडून प्रयत्न केला जात आहे. माहितीनुसार, हे तंत्र संसदेत लावण्याची तयारी देखील केली जात आहे.


हेही वाचा – …तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -