घरताज्या घडामोडीCyclone Jawad : ओडिशाच्या किनारपट्टी भागात ४ डिसेंबरला 'जवद' चक्रीवादळ धडकणार ;...

Cyclone Jawad : ओडिशाच्या किनारपट्टी भागात ४ डिसेंबरला ‘जवद’ चक्रीवादळ धडकणार ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Subscribe

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र झाले असून,त्याची तीव्रता वाढली आहे. आज २ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचे नाव ‘जवद’ असे देण्यात आले असून, हे नाव सौदी अरेबियाने दिले आहे. हेच ‘जवद’ चक्रीवादळ ४ डिसेंबर रोजी आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.ओडिशा सरकारने जवद चक्रीवादळासंदर्भात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारपट्टी भागातील १३ जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे वादळ जमीनीला धडकेल तेव्हा त्याचा वेग ८० ते ९० किमी प्रती तास इतका असेल.भारतीय हवामान खात्याचे महानिर्देशक मृत्यूंजय महापात्रा यांनी हे वादळ ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याची माहिती दिली आहे.

ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ३ डिसेंबरपासून पावसाची संततधार सुरु होईल. हवामान विभागाने गजपति, गंजम, पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर क्रेंद्रपाडा, कटक, खुर्दा, नयागड, कंधमाल, रायगड आणि कोराटपुट जिल्ह्यांना शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहचता यावी यासाठी ओडिशा सरकारने उपाययोजना केल्या आहेत.

- Advertisement -

राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे आयुक्त पी. के. जेना यांनी समुद्रामध्ये वादळ निर्मितीसंदर्भात आसमानी संकट येणार असल्याचा इशारा दिला आहे. या दरम्यान हवेचा वेग हा ४५ ते ५५ किमी प्रती तास इतका आहे. शुक्रवारी हवेचा वेग ६५ किमी प्रती तास इतका असण्याची शक्यता आहे. शनिवारी पहाटेच्या दरम्यान हे चक्रीवादळ समुद्रातून जमीनीवर दाखल होईल. मात्र हे वादळ नक्की कुठे लॅण्डफॉल म्हणजे जमिनीवर दाखल होणार हे अद्यापही सांगता येत नाही आहे. याचा फटका ओडिशाबरोबरच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला बसण्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हे ही वाचा – कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -