घररायगडमाथेरानच्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

माथेरानच्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

दस्तुरी ते अहिल्याबाई होळकर चौक इथपर्यंत एमएमआरडीएकडून काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.या रस्त्यावर ठेकेदाराने सांधे भरण्यासाठी ग्रीट मोठ्या प्रमाणात पसरवली आहे. हे ग्रीट आणि लिद या मिश्रणामुळे दुर्गंधी येऊन शारीरिक व्याधी होऊ शकतात.

माथेरान शहरात एमएमआरडीएकडून बसविलेल्या क्ले-पेव्हर ब्लॉक वरील टाकलेल्या ग्रीटमुळे धुळीचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रीट हटवली गेली नाही तर झाडू मारो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

प्रदूषणमुक्त शहर म्हणून माथेरानची ओळख आहे. हिरवीगार वनराई असे वैशिष्ट्य असलेल्या माथेरानमध्ये धूळ प्रदूषण रोखण्यासाठी तसेच येथील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी एमएमआरडीए अंतर्गत क्ले-पेव्हर ब्लॉकचे रस्ते सुरू आहेत. ठेकेदाराकडून क्ले-पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम दोन किलोमीरपर्यंत होत आले आहे.या ब्लॉक वर ठेकेदाराने सर्व रस्त्यावर ग्रीट अंथरलेली आहे. हे ग्रीट दोन ब्लॉकच्या सांध्यांमध्ये जाऊन ते सांधे भरले जातात. तर राहिलेले ग्रीट हे तसेच रस्त्यावर पसरून राहते. कालांतराने त्यावर घोडे चालून घोड्याची पडणारी लिद सुकल्यानंतर त्यातून दुर्गंधी येते. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

- Advertisement -

एमएमआरडीएमार्फत या रस्त्यावर काम होत असले तरी यावर देखरेख नगरपालिकेची आहे. पालिकेने त्वरित हे लिद मिश्रित ग्रीटचा ३ ते ४ इंचाचा थर हटविण्यास ठेकेदारास सूचित करावे,अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
दस्तुरी ते अहिल्याबाई होळकर चौक इथपर्यंत एमएमआरडीएकडून काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.या रस्त्यावर ठेकेदाराने सांधे भरण्यासाठी ग्रीट मोठ्या प्रमाणात पसरवली आहे. हे ग्रीट आणि लिद या मिश्रणामुळे दुर्गंधी येऊन शारीरिक व्याधी होऊ शकतात. यामुळे हे लिद मिश्रित ग्रीट हटविण्यासाठी माथेरान राष्ट्रवादी पक्षाकडून नगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे.जर ही लिद मिश्रित ग्रीट पुढील आठ दिवसात काढली नाही तर या रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झाडू मारो आंदोलन करण्यात येईल.

रस्त्यावरून रुग्णवाहिका किंवा मालवाहू घोडे धावले तर मोठ्या प्रमाणात धुळीचे लोळ उठतात. हीच धूळ श्वासावाटे शरीरात जाते. त्यामुळे छातीचे आजार उद्भवतात. यासाठी नगरपालिकेने ठेकेदाराला सूचना करून क्ले-पेव्हर ब्लॉक वरील लिद मिश्रित ग्रीट हटवावे. जेणेकरून या रस्त्यावरून चालणे सुसह्य होईल.
– कोंडीबा कदम, स्थानिक

- Advertisement -

एमएमआरडीएकडून महात्मा गांधी रोडवर रस्ता सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. माथेरान शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे.या रस्तावर ग्रीट मोठ्या प्रमाणात पसरवले आहे आणि त्यात घोड्याची लिद मिश्रित होत आहे. परिणामी उन्हामुळे यातून दुर्गंधी येत आहे. घोडे चालून याचे धुळीत रूपांतर होते व ही धूळ स्थानिकांसह पर्यटकांनाही त्रासदायक ठरत आहे. हा त्रास टाळण्यासाठी पुढील आठ दिवसात हे लिद मिश्रित ग्रीट काढले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाडू मारो आंदोलन करण्यात येईल. तसे पत्र आम्ही पालिकेला दिले आहे.
– अजय सावंत, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस, माथेरान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -