घरCORONA UPDATEदेशात कोरोनाच्या Record Break टेस्टिंग; १ दिवसात ५ लाखांहून अधिक चाचण्या!

देशात कोरोनाच्या Record Break टेस्टिंग; १ दिवसात ५ लाखांहून अधिक चाचण्या!

Subscribe

देशात आतापर्यंत एकून १ कोटी ८६ लाख ६ हजार ८०३ लोकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

देशात कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रूग्ण ओळखण्यासाठी रेकॉर्ड ब्रेकिंग चाचण्या देशभरात घेण्यात येत आहे. अमेरिका आणि रशिया नंतर भारतात कोरोना बाधित रूग्णांची ओळख पटवण्यासाठी सर्वाधिक चाचण्या घेत आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नुसार रविवारी, २६ जुलै रोजी देशभरात एकूण ५ लाख ५४ हजार ४७२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्या एकाच दिवसातील आतापर्यंतची सर्वात जास्त घेण्यात आलेल्या चाचण्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

रविवारी पहिल्यांदाच देशात दररोज घेण्यात येणाऱ्या चाचणीची संख्या ५ लाखांवर गेली आहे. आयसीएमआरच्या मते, देशात आतापर्यंत १.६८ कोटीहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या संदर्भात, यूएसए आणि रशिया नंतर भारतातील सर्वाधिक कोरोना चाचण्या आहेत. आतापर्यंत अमेरिकेत ५.४२ कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून रशियामध्ये २.६९ कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा भारतात सर्वात जास्त मृत्यू

देशात आता संसर्ग झालेल्यांची संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४९ हजार ९३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७०८ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. हे मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा सर्वात जास्त आहेत. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत साधारण ४४५ आणि ५५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारताच्या तुलनेत मेक्सिकोमध्ये (७२९) कमी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


देशात पहिल्यांदाच जवळपास ५० हजार नव्या रूग्णांची नोंद; बाधितांची संख्या १४ लाखांपार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -