Supreme Court : आजपासून मराठा आरक्षणप्रकरणी अंतिम सुनावणीला सुरूवात

State Backward Class Commission Report submitted to Bombay High Court on Maratha Reservation
मराठा आरक्षण

मराठा आरक्षणप्ररकणी आज, २७ जुलैपासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अंतिम आणि नियमित सुनावणीला सुरूवात होणार आहे. मागील सुनावणी दरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे यापुढे २७, २८ आणि २९ जुलै रोजी याचिकाकर्त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळा राखीव ठेवण्यात आली होती. त्याप्रमाणे आजपासून सुप्रीम कोर्टात एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. तसेच सुनावणी दरम्यान कोणत्या पक्षाने किती वेळ घ्यायचा आहे हे आधीच ठरवले जावे, कोणीही मुद्दा रिपीट करू नये, असेही कोर्टाने सांगितले असल्याने आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. हायकोर्टाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत असून आजच्या सुनावणीसाठी सरकारची पूर्ण तयारी झाली अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, सरकारच्या वतीने आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, भाई जगताप आणि विनायक मेटे देखील उपस्थित होते.

हेही वाचा –

देशात पहिल्यांदाच जवळपास ५० हजार नव्या रूग्णांची नोंद; बाधितांची संख्या १४ लाखांपार!