घरCORONA UPDATEदेशात पहिल्यांदाच जवळपास ५० हजार नव्या रूग्णांची नोंद; बाधितांची संख्या १४ लाखांपार!

देशात पहिल्यांदाच जवळपास ५० हजार नव्या रूग्णांची नोंद; बाधितांची संख्या १४ लाखांपार!

Subscribe

अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा भारतात सर्वात जास्त मृत्यू झाल्याची नोंद

भारतात कोरोनाचे संकट सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे बाधित झालेल्या लोकांबरोबरच मृतांची संख्याही वेगाने वाढत आहे. देशात आता संसर्ग झालेल्यांची संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४९ हजार ९३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७०८ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. हे मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा सर्वात जास्त आहेत. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत साधारण ४४५ आणि ५५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारताच्या तुलनेत मेक्सिकोमध्ये (७२९) कमी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत १४ लाख ३५ हजार ४५३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३२ हजार ७७१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९ लाख १७ हजार ५६८ लोकही बरे झाले आहेत.४ लाख ८५ हजार ११४ लोकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाची रूग्ण ओळखण्यासाठी भारतात रेकॉर्डब्रेकिंग चाचणी घेण्यात येत आहे, दररोज ५ लाखांहून अधिक कोरोना चाचणी करण्यात येत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या मते, शनिवारी देशात ५.१५ लाखाहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून आतापर्यंत देशात १.६८ कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


Shravan Somvar: जाणून घ्या, पहिल्या श्रावणी सोमवार व्रताविषयी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -