घरदेश-विदेशकोर्टाच्या 'या' अटींवर रॉबर्ट वाड्रांना परदेशात उपचारासाठी जाण्यास परवानगी

कोर्टाच्या ‘या’ अटींवर रॉबर्ट वाड्रांना परदेशात उपचारासाठी जाण्यास परवानगी

Subscribe

कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार रॉबर्ट वाड्रा ६ आठवडे अमेरिका आणि नेदरलँडला उपचारासाठी जाऊ शकतात.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या रडारवर असलेल्या रॉबर्ट वाड्रा यांना ट्यमूर असून त्याच्या उपचारासाठी त्यांना परदेशामध्य जाण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. रॉबर्ट वाड्रा लंडनमधील बेनामी संपत्ती प्रकरणी ईडी आणि सीबीआयच्या चौकशीचा सामना करत आहेत. नुकातच त्यांना मोठ्या आतडीमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले. यासाठी उपचार करण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे लंडनमध्ये जाऊन उपचार करण्याची परवानगी मागितली होती.

६ आठवडे उपचारासाठी परवानगी

दिल्लीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने याप्रकरणी सुनावणी करत असताना त्यांना परदेशामध्ये उपचार करण्यासाठी जाण्यास परवानगी दिली. मात्र कोर्टाने वाड्रा यांना लंडनला जाण्यास नकार दिला. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार रॉबर्ट वाड्रा ६ आठवडे अमेरिका आणि नेदरलँडला उपचारासाठी जाऊ शकतात.

- Advertisement -

ईडीने रॉबर्ट वाड्रावर केला आरोप

दरम्यान, दिल्लीच्या कोर्टाने सुनावणी दरम्यान ईडी वाड्रा यांच्या उचारासाठी परदेशामध्ये जाण्याच्या अर्जाला विरोध करत सांगितले की, परदेशामध्ये जाऊन काळ्याधनाला ठिकाणी लावण्यासाठी रॉबर्ट वाड्रा प्रयत्न करत आहे. त्यांना परदेशामध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ नये. कोर्टाच्या निर्णयाला ईडीच्या अर्जाशी जोडून पाहिले जात आहे.

वाड्राने कधी मागितली परवानगी?

मनी लॉन्ड्रींग प्रकरणातील आरोपी रॉबर्ट वाड्राने कोर्टाकडे केलेल्या अर्जामध्ये असे म्हटले होते की, माझ्या मोठ्या आतडीमध्ये ट्यूमर आहे. त्याच्या उपचारासाठी त्यांना लंडन आणि इतर दोन देशामध्ये जाण्याची परवानगी दिली जावी. वाड्रा याचे वकिल केटीएस तुलसीने कोर्टासमोर सांगितले की, मेडिकल रिपोर्टनुसार मोठ्या आतडीमध्ये एक छोटा ट्यूमर आहे. त्याच्या सेकंड ओपिनियनसाठी ते लंडन जाऊ इच्छित आहे. ईडीने रॉबर्ट वाड्राच्या या याचिकेला विरोध करत सांगितले होती की, वाड्रा देश सोडून पळून जाऊ शकतात.

- Advertisement -

कोर्टाने कोणत्या अटींवर दिली परवानगी?

कोर्टाने रॉबर्ट वाड्रांना काही अटींवर परदेशामध्ये उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे.

१ – रॉबर्ट वाड्रांना परदेशामध्ये ज्या ठिकाणी राहणार त्या ठिकाणचा पत्ता आणि फोन नंबरची माहिती द्यावी लागणार.

२. २५ लाखांची बँक गॅरंटी जमा करवाी लागणार.

३. परदेशातून परतल्यानंतर २४ तासाच्या आत सांगावे लागणार.

४. या दरम्यान पुराव्यांची छेडछाड आणि साक्षिदारांना प्रभावित केले जाऊ नये.

५. परतल्यानंतर ७२ तासाच्या आत तपास अधिकाऱ्याकडे जाऊन तपासामध्ये सहभागी व्हावे लागणार.

हेही वाचा – 

रॉबर्ट वाड्रांना ट्यूमर; कोर्टाकडे मागितली उपचारासाठी परवानगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -