घरताज्या घडामोडीDelhi Schools Update : दिल्लीत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ ; पुन्हा शाळा बंद...

Delhi Schools Update : दिल्लीत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ ; पुन्हा शाळा बंद होणार

Subscribe

गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाचे सावट थैमान घालत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय ठप्प होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे कोविडच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे शाळाही सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा शाळा बंद होणार आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, कोरोना पॉजिटिविटी रेट २ दिवसांनी ०.५ टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे दिल्लीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले प्रोटोकॉल पुन्हा लादण्यात येणार आहेत. त्यामुळे महाविद्यालय आणि शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या २५ डिसेंबरला ०.४३ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास शाळांनाही टाळे लागणार आहे.

शहरातील एक्टिव रुग्णांची संख्या आणि हॉस्पीटलमध्ये दाखल झालेल्यांच्या संख्येच्या आधारावर सरकार प्रतिबंध लागू करेल.माहितीनुसार, दिल्लीमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शाळी उद्या २७ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार होती. मात्र अशा परिस्थितीत ज्युनिअरचे वर्ग पुन्हा सुरु होतील की नाही, की अजून वाट पाहावी लागणार याबाबत साशंकता आहे.दिल्लीमधील सीनियर वर्ग हे १८ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले होते मात्र कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या आणि वायू प्रदूषण यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आली होती.

- Advertisement -

हे ही वाचा – India Vs South Africa Test Match: सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे मौन, हातावर बांधली काळीपट्टी


 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -