घरताज्या घडामोडीDelta variant: भारतीय डेल्टा व्हेरियंटचा आता अमेरिकेत धुमाकूळ

Delta variant: भारतीय डेल्टा व्हेरियंटचा आता अमेरिकेत धुमाकूळ

Subscribe

संपूर्ण जगभरात वेगाने पसरणारा कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट (Coronavirus Delta variant) आता अमेरिकेत धुमाकूळ घालत आहे. नव्या कोरोनाबाधितांमध्ये ५० टक्क्यांहून जास्त केसेस या डेल्टा व्हेरियंटच्या आहेत. याबाबतची माहिती अमेरिकेची सर्वोच्च आरोग्य संस्था सीडीसीने (Centers for Disease Control and Prevention) एक नव्या डाटा द्वारे सांगितली आहे. कोरोना हा डेल्टा व्हेरियंट B.1.617.2 या नावाने देखील ओळखला जातो. डिसेंबर २०२०मध्ये भारतात डेल्टा व्हेरियंट आढळला होता आणि हा व्हेरियंट आता जगभरात पसरला आहे.

अमेरिकेतील काही भागांमध्ये डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव ८० टक्क्यांहून जास्त नव्या कोरोनाबाधित प्रकरणांना जबाबदार आहे. सीडीसीच्या अंदाजानुसार, युटा आणि कॉलोराडोसह पश्चिम राज्यांमध्ये संक्रमित ७४.४ टक्के प्रकरणे आणि टेक्सास, लुईझियाना, आर्कान्सा, ओक्लाहोमा आणि दक्षिण राज्यांमध्ये संक्रमणाचे ५८.८ टक्के प्रकरणे डेल्टा व्हेरियंटचे आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, कोरोनाच्या नवीन प्रकरणात ५१.७ टक्के डेल्टा व्हेरियंट जबाबदार आहे. अमेरिकेचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेचे संचालक डॉ. अँथनी फाउचीने सीएनएनला सांगितले की, ज्या लोकांनी लस घेतली नाही आहे, त्या लोकांना या व्हेरियंटपासून संक्रमित होण्याचा धोका जास्त आहे. गंभीर आजारी होण्याचे कारण डेल्टा व्हेरियंट ठरू शकतो.

अमेरिकेत यापूर्वी अल्फा व्हेरियंटच्या जास्त केसेस येते होत्या. आता या व्हेरियंटच्या केसेसमध्ये मोठी घट झाली आहे. आता अमेरिकेत अल्फाचे फक्त २८.७ टक्के केसेस राहिल्या आहेत. डॉ. फिलिप केइजर म्हणाले की, समूहात वेगाने डेल्टा व्हेरियंट पसरण्याचे कारण काय आहे? याचे सध्या परीक्षण करत आहोत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार डेल्टा व्हेरियंटमुळे संक्रमित प्रौढ आणि लहान मुलांची वाढती संख्या चिंता वाढवत आहे.

- Advertisement -

डेल्टा व्हेरियंटबाबत डॉ. रवि गोडसे काय म्हणाले?, ऐका

२ ऑक्टोबरपर्यंत देश मास्कमुक्त होईल – डॉ. रवि गोडसे | Dr Ravi godse interview on corona

कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सध्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेतील डॉ. रवि गोडसे यांच्यासोबत केलेली बातचित.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, July 6, 2021

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -