घरट्रेंडिंगजगातील सर्वात मोठा घोडा 'बिग जेक'चा मृत्यू, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती...

जगातील सर्वात मोठा घोडा ‘बिग जेक’चा मृत्यू, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती नोंद

Subscribe

पूर्वीच्या काळी घोड्यांचा वापर राज्यकर्त्यांच्या सवारीसाठी केला जात होता. तसेच युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या घोडांना इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. परंतु आजही लोक आवडीने घोड्यांचे पालन करतात. अशाच एका जगातील सर्वात मोठ्या घोड्याचे निधन झाले आहे. बिग जेक असे त्याचे नाव होते. बिग जेक २० वर्षांचा असल्यापासून बेल्जियममधील पॉयनेट येथील स्मोकी हॉलो फार्ममध्ये राहत होता. फार्म मालक जेरी गिल्बर्ट आणि त्यांची पत्नी वॅलिसिया गिल्बर्ट त्याचे पालन पोषण करायचे, परंतु दोन आठवड्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.

यावर गिल्बेट कुटुंबियांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की” आम्हाला त्याचा मृत्यूची तारीख आठवत नाही. परंतु आमच्या कुटुंबासाठी ‘बिग जेक होणे ही अत्यंत क्लेशकारक घटना आहे. जगातील सर्वात मोठा घोडा असलेला बिग जेक ६ फूट १० इंच इतका उंच होता. तर त्याचे वजन २५०० पौंड होते म्हणजेच ११३६ किलोग्राम इतके होते.

- Advertisement -

बिग जेक याची २०१० मध्ये जगातील सर्वात उंच घोडा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या घोड्याचे मालकजेरी गिलबर्ट सांगतात, बिग जेक एक “सुपरस्टार” आणि “खरोखर विलक्षण प्राणी” होता. त्याचा जन्म नेब्रास्का येथे झाला त्यावेळी त्याचे वजन २४० पौंड म्हणजे १०९ किलोग्रॅम होते, जे सामान्य बेल्जियमच्या तुलनेत ४५ किलोग्राम जास्त होते. बिग जेकची आठवणी जपून ठेवण्याची त्यांनी एक योजना बनवली आहे. यासाठी ते एक स्टॉल रिकामा ठेवून आणि त्यात बिकच्या चित्रासह व काही वस्तू संग्रहित करणार आहेत.


‘या’ देशात सापडला १,१७४ कॅरेटचा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -