Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Afghanistan: तालिबानच्या राजवटीत १५० हून अधिक अफगाण माध्यमं केली बंद

Afghanistan: तालिबानच्या राजवटीत १५० हून अधिक अफगाण माध्यमं केली बंद

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) आता बंदूकीच्या धाकेमुळे कलमांची ताकद कमी होताना दिसत आहे. सतत माध्यम संस्था बंद केल्या जात आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा (Taliban) कब्जा झाल्यानंतर २० प्रांतामधील १५३ माध्यम संस्थांनी आपले काम बंद केले आहे. यासाठी स्थानिक माध्यमांनी देशातील मुक्त माध्यमांना समर्थन देणाऱ्या संस्थांचा हवाला दिला.

टोलो न्यूज एजेंसीने मंगळवारी सांगितले की, संस्थेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बंद होणाऱ्या माध्यम संस्थांमध्ये रेडिओ, प्रिंट आणि टीव्ही चॅनलचा समावेश आहे. हे बंद होण्यामध्ये आर्थिक समस्या आणि निर्बंध ही दोन महत्त्वाची कारणे आहेत. जर माध्यमांचे अर्थिक संकट दूर झाले नाहीतर आणि त्याच्या विरोधातील निर्बंध हटवले नाहीतर देशात इतर माध्यम संस्था बंद होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तान फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट्सचे उपप्रमुख हुजतुल्लाह मुजादादी यांच्या हवाल्याने टोलो न्यूज म्हणाले की, या प्रवृत्तीमुळे चिंता निर्माण झाली आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनाकडून ही समस्या सोडविण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचा आग्रह केला आहे. अन्यथा, लवकरच ते पत्रकाराचे स्वातंत्र्य आणि इतर मानवी आणि नागरी स्वातंत्र्यांचा अंत होईल, असे म्हटले गेले आहे.

दरम्यान तालिबानने आता काही प्रांतामध्ये एक नवा आदेश जारी केला आहे. एका वृत्तात दावा केला आहे की, दुर्रानी नसलेल्या अनेक पश्तून गटांना त्यांचे घर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना दुसरीकडे कुठेतरी जाऊ राहण्याचा आदेश दिला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तालिबानला हजारो जातीच्या नऊ लोकांच्या हत्येबद्दल टीकेला सामोरे जावे लागत आहे. व्यवसायाने पत्रकार आणि लेखक असलेले नतीक मिलकजादा यांनी ट्वीट केले आहे की, तालिबानने दाईकुंडीमध्ये ३०० हजार कुटुंबियांना घर सोडण्याचे आदेश दिले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Afghanistan: अफगाण वंशाच्या भारतीय व्यावसायिकाचे काबूलमध्ये अपहरण


 

- Advertisement -