घरदेश-विदेश८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट, DA मध्ये पुन्हा मोठी वाढ

८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट, DA मध्ये पुन्हा मोठी वाढ

Subscribe

केंद्रातील मोदी सरकाराने (Modi Government) तब्बल ८ लाख बँक कर्मचाऱ्यांना दिवाळीचं (Diwali Gift) मोठं गिफ्ट दिलं आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, डीएमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ८ लाखांहून अधिक बँकर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हा महागाई भत्ता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी २०२१ साठी आहे. विशेष म्हणजे यावेळी महागाई भत्ता ३०.३८ टक्क्यांवर पोहचला आहे.

इंडियन बँक्स असोसिएशन (Indian Banks Association (IBA) च्या आदेशानुसार, यावेळी महागाई भत्त्यात ३७ स्लॅबमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरसाठी ३० स्लॅबमध्ये वाढ करण्यात आला होता. AIACPI ((All India Average Consumer Price Index)) डेटा जाहीर केल्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

IBA नुसार, Industrial worker साठी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी AIACPI सरासरी ८०८८.०४ आहे. यामुळे डीएमध्ये ३९७ स्लॅबवरून ४३४ स्लॅब (८०८८.०४ – ६३५२ = १७३६.०४\४ = ४३४ स्लॅब) पर्यंत वाढतो. IBA च्या मते, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२१ साठी डीए ३९७ स्लॅब होता. यामुळे त्यात ३७ स्लॅबची वाढ झाली आहे. म्हणजेच या यांचा डीए ३०.३८ टक्के झाला आहे. त्यानुसार सरकारी बँकर्सचा डीए ३ टक्क्यांहून अधिकने वाढला आहे. (DA Hike)

DA ची गणना

DA ८०८८.०४ – ६३५२= १७३६.०४/४ = ४३४ स्लॅब

- Advertisement -

शेवटच्या तिमाहीत स्लॅब : ४३४

DA मध्ये वाढ = ४३४-३९७= ३७ स्लॅब (३०.३८ टक्के)

पगार किती वाढेल

IBA चे एचआर विभागाचे वरिष्ठ सल्लागार ब्रिजेश्वर शर्मा यांच्या मते, सरकारी बँकेत काम करणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसरचा मासिक पगार ४० ते ४२ हजार रुपये आहे. यात त्यांचा मूळ दरमहा पगार २७,६२० रुपये आहे. डीएमध्ये ३ टक्क्यांहून अधिक वाढ केल्यास पगारावर परिणाम होईल. वरिष्ठ सल्लागार ब्रिजेश्वर शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, बँक पीओला संपूर्ण सेवेदरम्यान ४ वेळा वेतनवाढ देखील मिळते. बढतीनंतर कमाल मूळ वेतन ४२०२० रुपयांपर्यंत जाते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -