घरताज्या घडामोडीVideo : बिबट्या आणि कुत्रा अडकला ७ तास एकाच शौचालयात

Video : बिबट्या आणि कुत्रा अडकला ७ तास एकाच शौचालयात

Subscribe

एकाच शौचालयात कुत्रा आणि बिबट्या आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुब्रह्मण्य प्रदेशातील किडू रिझर्व फॉरेस्टच्या किनाऱ्यावर असलेल्या फार्म हाऊसमध्ये हा प्रकार घडला आहे. बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करण्यासाठी गेला आणि आत अडकून पडला. तब्बल सात तास कुत्रा आणि बिबट्या शौचालयात अडकले होते. अखेर ७ तासानंतर बिबट्या आणि कुत्र्याची सुटका करण्यात वनविभागाला यश आले.

- Advertisement -

नेमके काय घडले?

भटक्या कुत्र्याला पाहताच बिबट्याने त्याची भक्षा करण्यासाठी त्याचा पाठलाग केला. स्वत:ला वाचवण्यासाठी कुत्र्याने आपला वेग वाढवला आणि धूम ठोकली. मात्र, बिबट्याने कुत्र्याचा पिछा काही सोडला नाही. अखेर कुत्रा एका फार्म हाऊसच्या शौचालयात शिरला. त्याच्या पाठोपाठ बिबट्यानेही शिरकाव केला. मात्र, कुत्र्याचा पाठलाग करणे बिबट्याला महागात पडले. कुत्रा आणि बिबट्या त्या शौचालयात तब्बल ७ तास अडकले. ही घटना बिलिनेल गावच्या कैकंबा येथील रेप्पांच्या फार्म हाऊसमध्ये घडली आहे.

- Advertisement -

वनविभागाने केली ७ तासाने सुटका

उप वनसंरक्षक व्ही. करिकलन यांनी दिलेल्या माहितीनुसार; रेगप्पा यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शौचालयातून आवाज आला. त्यामुळे त्यांनी शौचालयात डोकावून पाहिले तर त्यांना शौचालयात बिबट्या आणि कुत्रा आढळून आला. त्यानंतर त्यांनी शौचालयाच्या दरवाजाला कुलूप लावले आणि वनविभागाला पाचारण केले. मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा आढावा घेत शौचालयाच्या बाहेर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. पिंजरा लावल्यानंतर शौचालयााचे कुलूप उघडले आणि बिबट्याला पिंजऱ्यात पकडले. अखेर ७ तासाने बिबट्या आणि कुत्र्याची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली.


हेही वाचा – काय सांगताय! बँकेत पैसे नाही तर मिळतायत ‘बकऱ्या’


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -