घरCORONA UPDATECorona: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपावर WHO चा पलटवार

Corona: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपावर WHO चा पलटवार

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस Adhanom घेब्रियेसुस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले आरोप फेटाळले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर नुकतेच गंभीर आरोप केले होते. या संघटनेचे लक्ष केवळ चीनवर आहे. मात्र, त्यांनी हे विसरू नये की अमेरिका त्यांना सर्वाधिक पैसा पुरवते, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या या आरोपाला आता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस Adhanom घेब्रियेसुस यांनी  उत्तर दिले आहे. आम्ही केवळ चीनवर लक्ष केंद्रीत केले आहे, हा समज चुकीचा आहे. खरंतर या कठिणप्रसंगी दोन्ही देशांनी मिळून उपाययोजना करायला हव्यात, असे महासंचालकांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेने लावलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत.

हेही वाचा – देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; २४ तासांत ४८५ जण कोरोनाबाधित

- Advertisement -

अशावेळी निधी कमी करणे अयोग्य 

जिनेव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत संघटनेचे महासंचालक टेड्रोस Adhanom घेब्रियेसुस यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ‘जागतिक आरोग्य संघटना ही केवळ चीनवर लक्ष देत असल्याचा आरोप चुकीचा आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना अशावेळी निधी कमी करणे योग्य होणार नाही. अशा कठिणप्रसंगी अमेरिका आणि चीनला एकत्रितपणे कोरोना विषाणूला समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, असे महासंचालकांनी म्हटले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऐक्याशिवाय कोरोना विषाणूचा पराभव होऊ शकत नाही. त्यामुळे याचे राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर गंभीर आरोप केले होते. जागतिक आरोग्य संघटनेने चीनवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या संघटनेला अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. जेव्हा मी चीनमधून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली, तेव्हा जागतिक आरोग्य संघटना माझ्याशी सहमत नव्हती आणि त्यांनी माझ्यावर टीका केली. ते बर्‍याच गोष्टींबद्दल चुकीचे होते. असं दिसतंय की त्यांचे चीनवर अधिक लक्ष आहे. त्यामुळे आम्ही जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर बंदी घालण्याच्या विचारात आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -