घरदेश-विदेशस्पॅनिश फ्लूदरम्यान उपचार करण्यासाठी व्हिस्की ठरली होती असरदार!

स्पॅनिश फ्लूदरम्यान उपचार करण्यासाठी व्हिस्की ठरली होती असरदार!

Subscribe

कोणतेही व्यसन केल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे शक्यतो अल्कोहोलपासून दूर राहण्याचा सल्ला नेहमी देण्यात येतो. मात्र तुम्हाला माहित आहे का? २०१८ मध्ये सर्वात धोकादायक महामारीचा जगावर परिणाम झाला तेव्हा वैद्यकीय तज्ज्ञांनी व्हिस्कीला पाठिंबा दर्शवला होता. स्पॅनिश फ्लू हा सर्व साथीच्या आजारांपैकी सर्वात जीवघेणा रोग म्हणून ओळखला जातो. कारण या स्पॅनिश फ्लूने जगातील ३ ते ५ टक्के लोकसंख्येचा बळी गेला आहे. तर असेही सांगितले जाते की, १९१९ ते १९२० दरम्यान ५० ते १०० दशलक्ष लोकांचे जीव गेला होता.

असे सांगितले जाते की, अमेरिकेत स्पॅनिश फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लोकांनी जुन्या उपचारांचा आधार घेतला तो म्हणजे अर्थात व्हिस्की. व्हिस्कीचे अल्प प्रमाणात सेवन केल्याने औषधी फायदे मिळतात अशी शिफारस केली असल्याचे सांगितले जात होते. इन्फ्लूएन्झापासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि फ्रंटलाइन कामगारांकडून नियमित व्हिस्कीचा वापर देखील केला जातो. तर काही डॉक्टरांचे असे म्हणणे होते की, दारू, व्हिस्कीचे व्यसन नियमित केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ४ एप्रिल, १९१९ रोजी एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका लेखात असे सांगण्यात आले होते की, व्हिस्की केवळ उत्तेजक म्हणूनच काम करत नाही तर वेदना कमी करण्यास देखील मदत करते. व्हिस्की प्यायल्याने अस्वस्थतेपासून मुक्तताही मिळत असल्याचे सांगितले गेले होते, जे संक्रमणास प्रतिकार करण्यास निश्चितच मदत करते.

- Advertisement -

आमच्याकडे बरेच रुग्ण होते पण त्यांच्यावर उपचार करायला वेळ मिळाला नाही. आम्ही शरीराचे तापमान देखील मोजले नाही, तर आमच्याकडे रक्तदाब तपासण्यासाठीही वेळ नव्हता. अशा वेळी आम्ही रूग्णांना शरीरास उबदार ठरणारी व्हिस्की पायला द्यायचो, असे अमेरिकेच्या नेव्हीमधील शिकागोजवळील नेव्हल स्टेशन ग्रेट लेक्स येथे तैनात असलेल्या नर्स ज्युली मॅबेल ब्राउन यांनी सांगितले.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -