घरदेश-विदेशविंचूचे विष विकून कमवतोय लाखो रूपये

विंचूचे विष विकून कमवतोय लाखो रूपये

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून इजिप्तच्या वाळवंटात आणि किनारी भागात विंचू पकडण्याचा छंद होता.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना वेगवेगळ्या वस्तू जमा करायचा छंद असतो. पण हाच छंद जर तुम्हाला लाखो रूपये कमवून दिले तर? गेल्या २५ वर्षांपासून आपला अनोखा छंद जोपासून लाखो रूपये कमावणारा मोहम्मद हमदी हा या लोकांपैकी एक आहेत. इजिप्तमध्ये राहणारे मोहम्मद हमदी विंचवाचे विष विकून एका वेळीच ७३ लाख रूपये कमावतो. त्याच्या हा अनोखा छंद त्याला एकदिवस इतके यशस्वी आणि श्रीमंत करेल असे त्याला वाटले नव्हते.

१ ग्रॅम विषासाठी मोहम्मद तब्बल ७३ लाख रूपये कमावतो. गेल्या अनेक वर्षांपासून इजिप्तच्या वाळवंटात आणि किनारी भागात विंचू पकडण्याचा छंद होता. आर्कियोलॉजीमध्ये डिग्री मिळवलेला मोहम्मद विंचवाचे विष काढून त्यापासून ओषधे तयार करतो. वयाच्या २५व्या वर्षीच मोहम्मद कायरो वेनोम कंपनीचा मालक बनला. हे एक असे ठिकाण आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे ८० हजारांहून अधिक विंचू आणि साप ठेवले जातात. या सापांचे आणि विंचूचे विष काढून त्यापासून ओषधे तयार करून ती विविध कंपन्यांना विकली जातात.

- Advertisement -

अल्ट्रावॉयलेट लाइटच्या मदतीने विंचवाचे विष काढले जाते. विष काढण्यासाठी विंचूला हलका शॉक देण्यात येतो. इलेक्ट्रिक शॉक दिल्याने विंचूचे विष बाहेर येते. एका अहवालात असे सांगितले आहे की, एक ग्रॅम विषापासून जळवळपास २० हजार ते ५० हजार विषरोधक डोस बनवू शकतो.

मोहम्मद हामदी हे विष युरोप आणि अमेरिकेत सप्लाय करत होता. या ठिकाणी या विषाचा एंटीवेनम डोस आणि हाइपरटेंशन सारख्या आजारावर ओषध बनवण्यासाठी वापर केला जातो. विंचूचे १ ग्रॅम विष जवळपास ७३ लाखांना मिळते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एन्ड प्रीवेशनच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत दरवर्षी ८० हजारांहून अधिक लोकांना विषारी साप चावतो. या विषारी चावल्यास माणसाला त्वरित इलजाची गरज असते. एंटीवेनम ड्रग्जचे बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे या औषधांच्या किंमती जास्त असतात.

- Advertisement -

हेही वाचा – २०२० : मोस्ट पॉप्युलर Tweet’s

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -