घरदेश-विदेशकोरोनानंतर इबोलाची दहशत; युगांडात संचारबंदी, प्रार्थनास्थळांवरही निर्बंध

कोरोनानंतर इबोलाची दहशत; युगांडात संचारबंदी, प्रार्थनास्थळांवरही निर्बंध

Subscribe

या जिल्ह्यांना महामारीचे केंद्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. मुसेवेनी म्हणाले, “इबोलाचा प्रसार रोखण्यासाठी हा तात्पुरता उपाय आहे. आपण सर्वांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे जेणेकरुन आपण हा प्रादुर्भाव कमीत कमी वेळेत संपवू शकू.”

कंपाला – पूर्व अफ्रिकेतील युगांडामध्ये पुन्हा एकदा इबोलाचा प्रसार सुरू झाला आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्याकरता युगांडाचे अध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, इबोला प्रभावित असलेल्या भागात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तर, दोन जिल्ह्यांमधील प्रार्थनास्थळे आणि मनोरंजनाची ठिकाणंही २१ दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत.

हेही वाचा – ‘आईचं दूध’ विकणाऱ्या कंपन्यांची खैर नाही; केंद्र सरकारने घातली बंदी

- Advertisement -

मध्य युगांडातील मुबेंडे आणि कासांडा जिल्ह्यांमध्ये इबोलाचा प्रसार झपाट्याने होत असून, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये निर्बंध लादण्यात येत आहेत. तसंच, या जिल्ह्यांना महामारीचे केंद्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. मुसेवेनी म्हणाले, “इबोलाचा प्रसार रोखण्यासाठी हा तात्पुरता उपाय आहे. आपण सर्वांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे जेणेकरुन आपण हा प्रादुर्भाव कमीत कमी वेळेत संपवू शकू.”

मुसेवेनी म्हणाले की, २० सप्टेंबर रोजी प्राणघातक इबोलाचा उद्रेक जाहीर झाल्यापासून पूर्व आफ्रिकन देशात १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, २४ वर्षीय व्यक्तीकडून घेतलेल्या नमुन्याच्या चाचणीत हा आजार आढळून आला, त्यानंतर आफ्रिका सतर्क झाली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, यासाठी कोणतीही प्रभावी लस नाही.

- Advertisement -

आफ्रिकेतील इबोलाचा उद्रेक अनेक वर्षे जुना आहे. या देशात हा आजार अचानक वाढू लागतो आणि नंतर थांबतो. जेव्हा-जेव्हा इबोलाची प्रकरणे समोर येतात, तेव्हा आफ्रिका आरोग्याबाबत सजग होते, कारण हा इतका धोकादायक आजार आहे की, या आजारामुळे देशातील अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

हेही वाचा – MBBS चा अभ्यासक्रम आता हिंदीतही; अमित शाहांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

काय आहे इबोला?

इबोला हा प्राणघातक विषाणूजन्य ताप आहे. ज्यामध्ये ताप, उलट्या, रक्तस्त्राव आणि जुलाब ही मुख्य लक्षणे आहेत. यापूर्वी 2018 मध्ये, इबोलाचा उद्रेक कांगोच्या विषुववृत्त प्रांतात पसरला होता. त्यावेळी ५४ जणांना याची लागण झाली होती. यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला होता. काँगोमध्ये दोन नवीन लसीही तयार करण्यात आल्या होत्या, परंतु असे असतानाही इबोला विषाणूमुळे आतापर्यंत 2260 लोकांचा मृत्यू झाला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -