घरदेश-विदेशमतपत्रिकेवर परतणे चुकीचे - निवडणूक आयोग

मतपत्रिकेवर परतणे चुकीचे – निवडणूक आयोग

Subscribe

व्हिव्हिपॅट आणि ईव्हीएम मशीन्सला वाढता विरोध पाहता निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घेणे चुकीचे’, असल्याचे मत मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी मांडले आहे. शिवाय “राजकीय पक्ष यासंदर्भात निर्णय घेण्यास मुक्त असल्याचे” देखील त्यांनी स्पष्ट केले. व्हिव्हिपॅट मशीन्समध्ये वाढता घोळ पाहता व्हिव्हिपॅट मशीन्सद्वारे निवडणुका घेण्यास देशातल्या अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यावर बोलताना रावत यांनी आपले मत मांडले. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत व्हिव्हिपॅट-ईव्हीएम मशीन्समध्ये असणारे दोष दूर केले जातील असेही रावत यांनी स्पष्ट केले.

का होतोय ‘व्हिव्हिपॅट’ला विरोध?

मतदानाच्या वेळी मशीन्स अचानकपणे बंद पडणे किंवा एकाच पक्षाच्या पारड्यात मते जाणे, यासारख्या तक्रारी व्हिव्हिपॅट मशीन संदर्भात आल्या आहेत. राज्यातल्या पालघर-भंडारा पोटनिवडणुकीमध्ये देखील व्हिव्हिपॅट मशीन्स बंद पडल्याचे प्रकार घडले. परिणामी, काही ठिकाणी फेरमतदानाची मागणी पुढे आली. शिवाय सत्ताधारी भाजपवर देखील मशीन्समध्ये घोळ केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यामुळे व्हिव्हिपॅट मशीन्सच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. पालघर-भंडारा पोटनिवडणुकीदरम्यान तापमान वाढीचा परिणाम मशीन्सवर झाल्याचे स्पष्टीकरण यावेळी निवडणूक आयोगाने दिले होते. याच आधारावर निवडणूक आयोगावर टीका देखील करण्यात आली.

- Advertisement -

२०१९ पर्यंत मशीन्स सुरळीत होतील

२०१९ पर्यंत व्हिव्हिपॅट मशीन्समध्ये होणारे घोळ हे दूर केले जातील. शिवाय कर्मचाऱ्यांना देखील त्यासंदर्भात योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिली. पंजाब विधानसभा निवडणुकी दरम्यान देखील जवळपास ३६ टक्के मशीन्स या अचानकपणे बंद पडल्या होत्या. “व्हिव्हिपॅट मशीन्समध्ये असलेल्या या त्रुटी या वेळेवर दूर केल्या जातील . शिवाय, कर्मचाऱ्यांना देखील योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल”, अशी माहिती ओ. पी. रावत यांनी दिली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -