घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : जागावाटपावरून मविआत बेबनाव? वंचित आघाडीला चार जागांची ऑफर

Lok Sabha 2024 : जागावाटपावरून मविआत बेबनाव? वंचित आघाडीला चार जागांची ऑफर

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीतील जागावाटपांचा घोळ अद्याप कायम आहे. त्यातही महाविकास आघाडीत नव्याने सहभागी झालेल्या Adv. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणमुळे जागावाटप कळीचा मुद्दा बनला आहे. परिणामी शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस प्रकाश आंबेडकर किंवा वंचि बहुजन आघाडीचा प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.

हेही वाचा – Electoral Bonds : काळा पैसा पुन्हा राजकारणात येण्याची भीती; अमित शाह यांची प्रतिक्रिया

- Advertisement -

मविआतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊनच निवडणूक लढवली जाणार असल्याचे मविआच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, मविआत जागावाटपावरून अद्याप रस्सीखेच सुरू आहे. 10 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दावे करण्यात येत आहेत. या जागांवरून अनेकवेळा चर्चा झाली, पण दोन्ही पक्ष या जागा एकमेकांसाठी सोडण्यास तयार नाहीत, असे प्रकाश आंबेडकर यांनी चार दिवसांपूर्वी म्हटले होते.

याशिवाय, वंचित बहुजन आघाडीबाबतही घोळ कायम आहे. महाराष्ट्रात केवळ चार जागा दिल्याने प्रकाश आंबेडकर नाराज असल्याचे बोलले जाते. मागील बैठकीत आंबेडकर यांनी राज्यातील 27 लोकसभेच्या जागांची मागणी केली होती आणि या जागांसाठी त्यांचा पक्ष तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. या 27 पैकी काही जागा अशा आहेत की, त्या जागा काँग्रेसच्या समजल्या जातात. वंचित आघाडीच्या यादीत अकोला, दिंडोरी, रामटेक, अमरावती आणि मुंबई शहरातील एक जागा होती, असे सांगितले जाते. मात्र, महाविकास आघाडीकडून त्यांना चार जागांची ऑफर देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : घटना बदलण्यासाठी भाजपाला बहुमत हवे, राऊतांचा गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीने आम्हाला दिलेल्या 27 जागांच्या यादीपैकी आम्ही त्यांना चार जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना या चार जागांबाबत विचार करण्यास सांगितले आहे. त्यांना काय हवे आहे, ते त्यांनी सांगावे. आमचे दरवाजे वंचित बहुजन आघाडीसाठी खुले असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सांगितले.

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी शुक्रवारी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड तसेच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. परंतु प्रकाश आंबेडकर आले नाहीत किंवा त्यांचा एकही प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

हेही वाचा – Ambadas Danve : मी नाराज नाही, पण…; लोकसभा लढवण्याची अंबादास दानवेंची इच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -