घरदेश-विदेशईव्हीएम मशीनसंदर्भात केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले

ईव्हीएम मशीनसंदर्भात केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले

Subscribe

ईव्हीएम मशीनसंदर्भात हॅकर्सने केलेल्या दाव्याला निवडणूक आयोगाने फेटाळले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कोणीही बदल करू शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अमेरिकन सायबर एक्सपर्टने केलेल्या दाव्यानुसार २०१४ मध्ये निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशिनमध्ये बदल करण्यात आले होते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांना याबद्दल माहिती होती. या कारणामुळे मुंडे यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा या हॅकरने केला आहे. मात्र निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. सैयद शुजा असे या हॅकर्सचे नाव आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची चौकशी करणारे अधिकारी तंजील अहमद यांचीही हत्या करण्यात आली असल्याचे सैयदने सांगितले. मुंडेची हत्या दुर्घटनेत झाली नसल्याचे चौकशीत सांगण्यात आले होते या नंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडली आहे.

ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते

लंडन येथे आयोजित केलेल्या ईव्हीएम हॅकेथॉन या कार्यक्रमात ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते असे सांगण्यात आले. इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन(यूरोप) यांच्या तर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला
काँग्रेसचे जेष्ठनेते कपील सिबल उपस्थित होते.

- Advertisement -

रिलायन्सने केली मदत

एक्सपर्टने केलेल्या दाव्यानुसार निवडणुकीदरम्यान रिलायन्सने भाजपची मदत केली. दिल्ली निवडणुकीदरम्यान मशीनमध्ये ट्रान्समिशन थांबवण्यात आले होते म्हणून भाजप दिल्ली निवडणुकांमध्ये अपयशी ठरली. निवडणुकीच ट्रान्समिशन आम आदमी पार्टी कडे वळवले होते. यामुळे या निवडणुकीत आपचा विजय झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -