घरदेश-विदेशElgar Parishad: शर्जील उस्मानी हाजीर हो! पोलीस ठाण्यात चौकशीला जाण्याचे उच्च न्यायालयाचे...

Elgar Parishad: शर्जील उस्मानी हाजीर हो! पोलीस ठाण्यात चौकशीला जाण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Subscribe

एल्गार परिषदेमधील हिंदूवर केलेल्या आक्षेपार्ह भाषाणासंबंधी लिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शर्जील उस्मानी विरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्याच्या चौकशी करिता शर्जील उस्मानीला पुणे पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. न्या. एस.एस.शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने उस्मानीवर १६ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना दिले आहेत. उस्मानीने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने त्यादिवशी पुढील सुनावणी ठेवली आहे. उस्मानीला पोलिसांनी समन्स बजावून बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तो पोलीस ठाण्यात हजर राहण्यास तयार आहे. मात्र पोलिसांना त्याला अटक करु नये, यावर आता न्यायालयानेही उस्मानी याला बुधवारी पुणे पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिलेत तर त्यावर कोणतीही कठोर पोलिसी करावाई न करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उस्मानी याच्यातर्फे त्याचे ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयात दिली आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदुविरोधात शर्जील उस्मानीने गरळ ओकली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शर्जीलवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्याच्याविरोधात २ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथील स्वारगेट पोलीस ठाण्यात धर्म, वर्ण व ठिकाण यावरून समाजात द्वेष निर्माण करणे या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र उस्मानीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. भाषण करण्यापूर्वी किंवा नंतर घटनास्थळावर असंतोष किंवा हिंसाचार झाला नाही. समाजातील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी आणि फौजदारी न्यायाव्यवस्थेचा ससेमिरा पाठी लावून खुलेपणाने व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर आळा घालण्यासाठी असे गुन्हे नोंदविण्यात येतात, असे उस्मानीने याचिकेत म्हटले आहे. ३० जानेवारी २०२१ रोजी पुण्यात कोरेगाव- भीमा लढाईच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांततापूर्ण मेळाव्यात आपण भाषण केले, असे उस्मानी यांनी याचिकेत म्हटले आहे.


हेही वाचा- चक्क एक कोटी शिवलिंग असलेलं अद्भूत मंदिर पाहिलत का!

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -