घरदेश-विदेशElon Musk Vs Twitter : ट्विटर माझ्या हातात आले तर पगार शून्य...

Elon Musk Vs Twitter : ट्विटर माझ्या हातात आले तर पगार शून्य करेन; एलन मस्कची मोठी धमकी

Subscribe

जगभरातील चर्चांना जन्म देणारे ट्विटरच आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलेय. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ही सोशल मीडिया कंपनी विकत घेण्याचा ऑफर दिली आहे. मात्र या ऑफरपासून आता ट्विटरचे बोर्ड अधिक सक्रिय झाले आहे. मस्क यांना जबरदस्तीने ट्विटरचा ताबा घ्यायचा आहे, असे आरोप ट्विटरकडून होत आहे. मस्कने ट्विटरला तब्बल 43 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याची ऑफर दिली आहे. मात्र ही ऑफर नाकारल्यास ट्विटरमधील गुंतवणुकीवर पुनर्विचार केला जाईल, अशी धमकीही मस्क यांनी दिली आहे.

एका यूजरच्या पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी ट्विट केले की, ‘माझी बोली यशस्वी झाली तर बोर्डाचा पगार शून्य होईल. अशा प्रकारे दरवर्षी 30 लाख डॉलर्सची बचत होईल. मस्क यांची सध्या ट्विटरमध्ये 9.1 टक्के हिस्सेदारी आहे आणि ती सोशल मीडिया कंपनीतील दुसऱ्या क्रमांकाची शेअर होल्डर आहे. गेल्या आठवड्यात मस्क यांनी ट्विटरमधील 100 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी 43 अब्ज डॉलर देऊ केले.

- Advertisement -

मस्कची बोली टाळण्यासाठी ट्विटरच्या बोर्डाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत पॉयझन पिलची तरतूद लागू करण्याची घोषणा केली. पॉयझन पिल ही कंपन्यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यापासून संरक्षण देणारी यंत्रणा आहे. मस्क किंवा इतर कोणत्याही गुंतवणूकदाराने 15 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा घेतल्यास ही तरतूद लागू होईल. ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे की, राइट्स प्लॅनमधून कोणतीही कंपनी, व्यक्ती आणि ग्रुप खुल्या बाजारातून शेअर्स खरेदी करून ट्विटरवर कब्जा करण्याची शक्यता कमी करेल.

मस्कने 1 एप्रिल रोजी ट्विटरमधील आपली हिस्सेदारी खरेदी केल्याचा खुलासा केला. तेव्हापासून ट्विटर आणि मस्क यांच्यात प्रचंड वाद सुरू आहे. मस्कला ट्विटरची ताकद समजते आणि ते आपले म्हणणे मांडण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे 8.1 कोटी फॉलोअर्स आहेत. ट्विटरने दावा केला होता की, मस्क त्यांच्या बोर्डात सामील होतील. पण मस्क यांनी ही ऑफर फेटाळून लावली आहे.

- Advertisement -

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दुख:चा डोंगर; नवजात मुलाचं निधन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -