घरताज्या घडामोडीEU Covid 'Green Pass': कोविशिल्डचा परवानगी अर्ज प्राप्त झाल्यास त्यावर विचार करू...

EU Covid ‘Green Pass’: कोविशिल्डचा परवानगी अर्ज प्राप्त झाल्यास त्यावर विचार करू – युरोपियन युनियन

Subscribe

भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. यादरम्यान सर्वाधिक कोविशिल्ड लसीचा वापर केला जात आहे. मात्र भारतात कोविशिल्ड लस घेतलेल्यांना युरोप जाणे कठीण झाले. कारण युरोपियन युनियनने कोविशिल्ड लसीला मंजुरीच दिली नसल्यामुळे ग्रीन पास मिळणे कठीण झाले असून युरोपात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. पण आता याच प्रकरणाला आज, मंगळवारी एक नवं वळणं आलं आहे. यूरोपियन मेडिसिन्स एजेंसीने (EMA)ने मंगळवारी म्हटले की, ‘कोविशिल्डकडून मंजुरीसाठी युरोपियन युनियनकडे कोणताही अर्ज दिलेला नाही. जर कोविशिल्डकडून अर्ज प्राप्त झाला तर त्यावर विचार करू. शिवाय जर सदस्य देशांना पाहिजे असेल तर भारतीयांना प्रवास करण्यास परवानगी देऊ शकतात.’

एएनआय वृत्तसंस्थेने युरोपियन संघाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सांगितले की, सोमवार संध्याकाळपर्यंत यूरोपियन मेडिसिन्स एजेंसीला कोविशिल्ड मंजुरीसाठी कोणताही अर्ज मिळाला नाही. जर अर्ज मिळाला, तर चाचणी करून मंजूरी देण्यावर विचार केला जाईल. शिवाय असे देखील सांगितले की, इएमए नवी औषधं आणि लसीची स्वतः चाचणी तोपर्यंत करत नाही, जोपर्यंत संबंधित कंपनीकडून अर्ज देऊन सांगितले जात नाही.

- Advertisement -

युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, कोरोनामुळे युरोपियन संघ व्यतिरिक्त इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर तात्पुरती बंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीत युरोपियन युनियनच्या देशांना परदेशी प्रवाशांना येथे येऊ द्यायचे असेल तर येऊ शकतात. जरी त्यांनी कोविशिल्ड लस घेतली असेल किंवा इतर लस.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -