घर देश-विदेश भाजपाने नुसता खिसा साफ केला तरी..., संजय राऊत यांचा हल्लाबोल

भाजपाने नुसता खिसा साफ केला तरी…, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : हिंदुत्वावर घाव घालणारे सर्व लोक भाजपात आले तसे ज्यांचे पूर्वज व घराणी मोगलांच्या चाकरीत धन्यता मानत होती, त्यांचे आजचे वंशज भाजपाच्या पखाली वाहताना दिसत आहेत. यापैकी अनेकांना भाजपाने खासदार, आमदार म्हणून निवडून आणले. ‘लव्ह जिहाद’ हा लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचाराचा मुद्दा असेल, पण भाजपात आज असे अनेक लोक आहेत ज्यांच्या पूर्वजांनी मोगलांना आपल्या लेकीबाळी दिल्या. भारतीय जनता पक्षाने नुसता खिसा साफ केला तरी, असे शंभरावर बाटगे मोगल पडतील, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा – सनी देओलला जो न्याय लावला, तो नितीन देसाईंना का नाही? संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

- Advertisement -

जयपूर राजघराण्याचे लोक भाजपामध्ये आहेत. त्यांनीच एकदा ताज महालावर हक्क सांगितला होता. दिव्या कुमारीच्या घराण्याने सगळ्यात आधी राजस्थानमध्ये मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. बादशहा अकबराशी भारमल राजाने आपली मुलगी हरखाबाई हिचा विवाह करून दिला. त्यानंतर भारमलच्या मुलाने आपली मुलगी मानबाई हिचा विवाह शहजादा सलीमशी करून दिला. हलदी घाटात महाराणा प्रताप यांचा पराभव ज्याच्या नेतृत्वाखाली मोगलांनी केला, तो मानसिंह हा त्यांचा पूर्वज. छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आलेला व शिवरायांचे सर्व किल्ले ‘तहात’ संधी साधून ताब्यात घेणारा मिर्जा राजे जयसिंग याच घराण्यातला. या सगळ्यांनी परक्या मोगल साम्राज्यासाठी आयुष्य वेचले, असे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे.

‘ही’ सर्व घराणी आज भाजपाबरोबर
औरंगजेबाने आग्य्रात शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले, तेव्हा ज्या रामसिंहला महाराजांसोबत ठेवले होते तो रामसिंहदेखील याच घराण्यातला. 1818मध्ये इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांशी लढणारा जगतसिंहदेखील याच घराण्यातला. हे सर्व आधी मोगलांचे व नंतर ब्रिटिशांचे मांडलिक झाले. हा इतिहास असला तरी ही सर्व घराणी आज भाजपाबरोबर आहेत व ते महाराष्ट्राला हिंदुत्व वगैरे शिकवत आहेत, असेही खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Amit Thackeray : ‘आम्ही देशद्रोही, मग…’, जागर पदयात्रेत अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

महुआ मोईत्रा यांनी केलेला दावा गंभीर
महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार. संसदेत त्या जोरदार भाषण करतात. त्यांचे भाषण ऐकून मोदींसह संपूर्ण भाजपाचा रक्तदाब वाढतो. त्यांनी सांगितले, “2024च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभरात दंगे घडवले जातील. अयोध्येत राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात देशभरातून विशेष ट्रेन सोडल्या जातील व त्यातील ट्रेनवर मुस्लिमांच्या गावांतून हल्ले घडवले जातील. त्यांना पुन्हा ‘गोध्रा’ करायचे आहे.” महुआ मोईत्रा यांनी जे सांगितले ते गंभीरच असल्याचे त्यांनी ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.

- Advertisment -