घरमहाराष्ट्रसनी देओलला जो न्याय लावला, तो नितीन देसाईंना का नाही? संजय राऊतांचा...

सनी देओलला जो न्याय लावला, तो नितीन देसाईंना का नाही? संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

Subscribe

मुंबई : सनी देओल यांना जो न्याय लावला, तो नितीन देसाईंना का नाही?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे. सनी देओल यांच्या बंगला लिलाव पुकारल्यानंतर दिल्लीतून सूत्र हलली आणि बंगल्याचा लिलाव थांबवला. मग नितीन देसाई यांच्यासोबत हा अन्याय का, सनी देओल हे भाजपचे खासदार असल्यामुळे त्यांना न्याय आणि नितीन देसाईवर अन्याय का? असे अनेक सवाल संजय राऊतांनी केंद्रावर केला आहे.

संजय राऊत म्हणाले, सनी देलोल हे पंजबाच्या गुरुदासपूरमधून निवडून आले, ते भाजपचे खासदार आहेत. सनी देओल यांनी 60-70 कोटी कर्ज घेतले होते आणि ते कर्ज ते फेडू शकले नाही. म्हणून बँकेने सनी देओल यांच्या बंगल्यासंदर्भात नोटीस काढली आणि लिलाव पुकारला होता. पण 24 तासांत दिल्लीतून काही सूत्रे हालली आणि सनी देओलच्या बगल्याचा लिलाव थांबविला गेला. सनी देओल आणि त्यांचा बंगल्याला वाचविले. मग हाच न्याय नितीन देसाईना का नाही. सनी देओल हे भाजपचे खासदार आहेत म्हणून त्यांना एक न्याय, तुमचे स्टार प्रचारक आहेत आणि महाराष्ट्राच्या नितीन देसाईला वेगळा न्याय?, तुम्ही नितीन देसाईला मरू दिलेत आणि त्यांच्या स्टुडीओचा ललाव होऊ देत आहात?”, असे अनेक सवाल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला करत त्यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

तसेच संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोकमधून देखील सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव थांबविल्यासंदर्भात त्यांनी भूमिका मांडली आहे. संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणाले, “नितीन देसाईंने यांना आत्महत्या करावी लागली. बँकाचे कर्ज डोक्यावर असल्याने त्यांच्या एनडी स्टुडिओवर जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. त्या धक्क्यातून देसाईने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असून कर्ज बुडवणाऱ्यांना अभय दिले जाते. पण भाजप असतील तर त्यांना नितीन देसाईंचे प्राण वाचवण्यात आले असते.”

हेही वाचा – सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबवला; वाचा काय आहे प्रकरण

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण

सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून 55.99 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड सनी देओलने अद्याप केलेली नाही. यामुळे बँकेने कर्ज वसुल करण्यासाठी सनी देओलचा बंगलाच लिलावाची नोटीस बजावली होती. यासंदर्भात बँकेने लिलावाची किंमत 51.43 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. बँकेने काढलेल्या जाहिरातीत म्हटले की, अजय सिंग देओलच्या ‘सनी व्हिला’ या बंगल्याचा लिलाव 25 सप्टेंबरला होणार आहे. सनी देओलचा बंगला हा जुहूच्या गांधी ग्राम रोडवर असून या बंगल्यात सुपर साउंड नावाचा रेकॉर्डिंग आणि डबिंग स्टुडिओ चालविला जातो. या बंगल्यात चित्रपटगृह, पूल, हेलिपॅड एरिया आणि गार्डन सर्व सुविधा आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -