घरदेश-विदेशकोरोना व्हायरस संबंधित अफवा रोखण्यासाठी फेसबुकचं पाऊल!

कोरोना व्हायरस संबंधित अफवा रोखण्यासाठी फेसबुकचं पाऊल!

Subscribe

कोरोना व्हायरस संबधित चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या कोणत्याही फेसबुक पोस्टला लाईक केले असेल किंवा त्यावर प्रतिक्रिया दिली असेल, अशा पोस्ट फेसबुकवरून हटवण्यात येणार

तुम्ही सोशल मीडियावर कोरोना व्हायरस संदर्भातील कोणत्याही फेसबुक पोस्टला लाईक केले आहे ? किंवा कोणती प्रतिक्रिया दिली आहे ? पण काही दिवसांनी ती फेसबुक पोस्ट खोटी तसेच अफवा पसरवणारी होती, असे तुम्हाला समजले असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सोशल मीडियातील सर्वाधिक वापर होणाऱ्या फेसबुकने गुरूवारी असे सांगितले की, कोरोना व्हायरस संबधित चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या कोणत्याही फेसबुक पोस्टला लाईक केले असेल किंवा त्यावर प्रतिक्रिया दिली असेल, अशा पोस्ट फेसबुकवरून हटवण्यात येणार आहे.

कोरोना संदर्भात पोस्ट शेअर करताय…?

तसेच कोरोना व्हायरस संदर्भातील कोणत्याही अफवा पसरवणाऱ्या पोस्टला तुम्ही शेअर किंवा लाईक केले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. फेसबुकने असेही म्हटले आहे की, या माध्यमातून युजर्स कोरोना व्हायरस संबंधित माहितीशी जोडले गेले असतील मात्र ती माहिती डब्ल्यूएचओने अफवा किंवा खोटी असल्याचे घोषित केले असेल, तर त्या युजर्सना कंपनीकडून चेतावणी देण्यात येणार आहे.

- Advertisement -

अफवा रोखण्यासाठी फेसबुकचं पाऊल!

कोरोना व्हायरस बद्दल नागरिकांना जागरूक करणारी माहिती, सुचना तसेच त्या संबंधित माहिती देण्यासाठी फेसबुककडून एक नवीन फीचर तयार करण्यात येणार आहे. या फीचरचे नाव “गेट द फॅक्ट्स” असे असून फेसबुक ते लवकरच सुरू करणार आहे. यामध्ये कोरोनाशी संबंधित लेखांचा समावेश असेल. तसेच कोरोनाविषयी दिशाभूल करणार्‍या आणि धोकादायक माहितीच्या प्रसार रोखण्यासाठी फेसबुकसह अनेक लोकप्रिय ऑनलाइन कंपन्यांनी देखील आपली पाऊले उचलली आहेत.


CoronaEeffect: धक्कादायक! झूम App वरील ५ लाख अकाउंट्स हॅक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -