घरताज्या घडामोडीCorona Vaccine: कोरोनाची लस घेतल्यानंतर पाचव्या दिवशी महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू!

Corona Vaccine: कोरोनाची लस घेतल्यानंतर पाचव्या दिवशी महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू!

Subscribe

संपूर्ण देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोठ्या मोहीमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना लस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जात आहे. पण आता कोरोना लसीचे दुष्परिणाम समोर येताना दिसत आहेत. तेलंगणामध्ये एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा लस घेतल्यानंतर पाचव्या दिवशी मृत्यू झाला आहे. १९ जानेवारीला या महिला कर्मचाऱ्याने लस घेतली होती. जिल्हा एईएफआय (Adverse event following immunization(AEFI) कमेटी याबाबत आता तपास करत आहे आणि राज्याने यासंदर्भातला रिपोर्ट एईएफआयला पाठवला आहे. तेलंगणाच्या पब्लिक हेल्थ डायरेक्टर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

यापूर्वी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील कुंठाला सरकार रुग्णालयात कोरोना लस घेणाऱ्या विठ्ठल नावाच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाला होता. या व्यक्तीने १९ जानेवारीला ११ वाजता कोरोना लस घेतली होता. सरकार रुग्णालयात तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. विठ्ठलाच्या मृत्यूबाबत निर्मल जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की, या मृत्यूचा कोरोना लससोबत याचा काहीही संबंध नाही आहे. दरम्यान तेलंगणामध्ये १९७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आता तेलंगणा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २.९३ लाखांवर पोहोचली आहे. तर यापैकी आतापर्यंत १ हजार ५८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान देशात लसी संदर्भात सध्या गैरसमज आणि अफवा पसवरल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात लस घेण्याबाबत एक भीती निर्माण झाली आहे. हिची भीती घालवण्यासाठी आणि लस घेण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस घेणार आहेत.


हेही वाचा – आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लस घेण्यास टाळाटाळ

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -