घरमहाराष्ट्रदिल्ली आंदोलनातील शेतकर्‍यांच्या पाठिंब्यासाठी हजारो शेतकरी मुंबईकडे

दिल्ली आंदोलनातील शेतकर्‍यांच्या पाठिंब्यासाठी हजारो शेतकरी मुंबईकडे

Subscribe

दिल्लीत आंदोलन करणार्‍या पंजाबच्या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी आज घाटनदेवी मंदिर परिसरात हजारो शेतकरी जमले. गाठीशी पीठ, मीठ, मिरची असा शिधा घेऊन रविवारी (दि.२४) हजारो शेतकरी इगतपुरी येथे विसाव्यासाठी विश्रांतीसाठी स्थिरावले होते.

रविवारी सकाळी घाटनदेवी येथून मुंबईकडे रवाना झाले. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पायी निघालेला हा जत्था केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. मूठभर कॉर्पोरेटस्ना मदत करण्यासाठी शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचा घाट घातला जातोय. यास विरोध करण्यासाठी गेल्या ५८ दिवसांपासून देशातील पाचशे शेतकरी संघटना एकत्र येऊन संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लढा देत आहे. दिल्लीतील हा लढा मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा ’नाशिक ते मुंबई वाहन मार्च रविवारी (दि.२४) सकाळी मुंबईकडे रवाना झाला. सोमवारी आझाद मैदानावर जमून सरकार विरोधात एल्गार करण त्यानंतर ते राजभवनवर जाऊन निवेदन देतील.

- Advertisement -

‘लढू अन् सरकारला कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडू’ या जिद्दीने या मोर्चात राज्याच्या विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्यभरातून हजारो आंदोलक वाहनांमधून घटनदेवी मंदिर परिसरात जमा झाले होते. मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. इगतपुरी वरून निघालेला वाहन मार्च २४ तारखेला आझाद मैदानावर सायंकाळी पोहचून महामुक्काम मोर्चा होईल. त्यांनंतर २५ तारखेपासून मोर्चा राजभवनावर निघून २६ जानेवारीपर्यंत चालेल. तीन कृषी विरोधी व चार कामगार विरोधी कायदे,प्रस्तावित वीज बिल मागे घेण्यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. तर संपूर्ण राज्यभरात जिल्हानिहाय आंदोलन छेडण्यात येईल,अशी माहिती डॉ.ढवळे यांनी दिली. यावेळी डॉ. ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी. एल. कराड, राज्य सचिव डॉ अजित नवले, सुनील मालुसरे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या मरीयम ढवळे, ’डीवायएफ’च्या नेत्या प्रीती शेखर आदी उपस्थित होते.

भोजनासाठी सोबत शिधा…

सलग तीन दिवस आंदोलक मुंबईत जमणार आहेत. शेतकरी, कामगार आंदोलकांनी सोबत शिधा आणला आहे. मात्र गैरसोय होऊ नये यासाठी सामाजिक संस्था, सिटू प्रणित कामगार संघटना मदत जमा करून भोजन व्यवस्था करणार आहेत अशी माहिती डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -