घरदेश-विदेशपीएफवर ८.६५ टक्के व्याज; ६ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा

पीएफवर ८.६५ टक्के व्याज; ६ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा

Subscribe

आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदर ८.६५ इतका करण्यास 'ईपीएफओ'ला हिरवा कंदील दाखवला असून यंदाचा कर्मचारी भविष्य निधीवर ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत वित्तीय सेवा विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदर ८.६५ इतका करण्यास ‘ईपीएफओ’ला हिरवा कंदील दाखवला आहे. यंदाच्या कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) २०१८ – १९ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के इतके व्याज मिळणार आहे. याबाबत ‘ईपीएफओ’ने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली असून या निर्णयाचा सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, गेल्या तीन वर्षांतील हा पहिला व्याज दरवाढ ठरला आहे.

तीन वर्षातील व्याजदर

  • २०१५ – १६ या आर्थिक वर्षात ईपीएफ व्याजदर ८.८ टक्के इतका व्याजदर होता.
  • तर २०१६ – १७ मध्ये ईपीएफ व्याजदर ८.६५ टक्के होता.
  • २०१७ – १८ मध्ये कमी करण्यात आला म्हणजे तो ८.५५ टक्के करण्यात आला.
  • २०१८ – १९ मध्ये ८.६५ व्याजदर करण्यात आला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -