घरदेश-विदेशकेरळात अंधश्रद्धेचे ४ बळी?

केरळात अंधश्रद्धेचे ४ बळी?

Subscribe

केरळामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. अंधश्रद्धेतून या चौघांचा बळी गेला आहे का? याबद्दल सध्या तपास सुरू आहे.

दिल्ली, झारखंडमध्ये सामुहिक आत्महत्येचे प्रकरण ताजे असताना आता केरळमध्ये देखील अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातील चौघांनी आपले जीवन संपवल्याचा संशय आहे. इडुक्की जिल्ह्यातील एका गावामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घराच्या मागील बाजुला पुरल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे या चौघांचा अंधश्रद्धेमुळे तर बळी गेला नाही ना? याबद्दल सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील आई,वडील आणि दोन मुलांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराच्या मागील बाजुला पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले. कृष्णा ( ५२ वर्षे ), सुशिला ( ५० वर्षे ) मुलगी अर्षा ( २२ वर्षे ) आणि अर्जुन ( २० वर्षे ) अशी या मृतांची नावे आहेत. शेजाऱ्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर सारा प्रकार उजेडामध्ये आला आहे. घटनास्थळावरून हातोडा आणि सुरा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यापूर्वी देखील दिल्लीतील बुऱ्हाडी कुटुंबातील ११ जणांनी तर झारखंडमधील ७ जणांनी आपले जीवन संपावले होते. एकावर एक अशा रितीने चौघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. दोन दिवासांपासून कुटुंबियांना न पाहिल्याने शेजाऱ्यांच्या मनात देखील शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले.

अंधश्रद्धेतून बळी?

दरम्यान, चौघांचा बळी अंधश्रद्धेने घेतला असावा असा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शेजारी देखील यासंदर्भात सध्या तपासात कार्यात सहकार्य करत आहेत. दरम्यान, मृत कुटुंबातील सदस्य शेजाऱ्यांशी देखील बोलत नव्हते. सर्वजण आपल्याच विश्वात मग्न असायचे. कृष्णा हे ज्योतिष होते. परिणामी त्यांच्या घरी अनेक जणांचे येणे – जाणे असायचे. फिल्मस्टारपासून अनेक बडे लोक त्यांच्या घरी यायचे अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. या चौघांना कुणीतरी मारले असावे. कारण घरामध्ये जबरदस्तीने घुसल्याची कोणतीही घटना अद्याप तरी पोलिसांना दिसलेली नाही. शिवाय, या संपूर्ण घटनेमध्ये दोन पेक्षा अधिक लोकांचा सहभाग असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सध्या तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

दिल्ली आणि राजस्थानमध्ये अंधश्रद्धेचे बळी

दिल्लीतील बुऱ्हाडी कुटुंबातील ११ जणांनी आयुष्य संपवल्याने देशात एकच खळबळ उडाली होती. घरामध्ये सापडलेल्या नोंदी पाहता अंधश्रद्धेतून सर्वांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अद्याप तपास सुरूच आहे. तसेच चार दिवसांपूर्वी देखील झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

वाचा – बुराडी आत्महत्या प्रकरणाचा खरचं उलगडा झाला का ?

वाचा – बुराडीनंतर आता झारखंडमध्ये ६ जणांनी संपवले आयुष्य

वाचा – सरकारी कर्मचाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -