घरदेश-विदेशभारतातील 'हे' दिग्गज पाकिस्तानला जाणार?

भारतातील ‘हे’ दिग्गज पाकिस्तानला जाणार?

Subscribe

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचा माजी कर्णधार कपिल देव, लिटील मास्टर सुनील गावस्कर, नवज्योत सिंग सिद्धु आणि अभिनेता अमिर खान यांना बोलवण्याचा सध्या पाकिस्तान सरकार विचार करत आहे.

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्या तेहरीक – ए – इन्साफ पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या. परिणामी आता इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुमत न मिळाल्याने तेहरीक – ए – इन्साफ सध्या अपक्ष आणि इतर पक्षांशी बोलणी करत आहे. दरम्यान इम्रान खान यांच्या शपथविधीची तयारी देखील सध्या जोरात तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्याला सार्क देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्याचा सध्या विचार आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र, भारतातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचा माजी कर्णधार कपिल देव, लिटील मास्टर सुनील गावस्कर, नवज्योत सिंग सिद्धु आणि अभिनेता अमिर खान यांना बोलवण्याचा सध्या पाकिस्तान सरकार विचार करत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरणविषयक प्रवक्ते फवाद चौधरी यांनी याविषयीची माहिती दिली आहे. ११ ऑगस्ट रोजी इम्रान खान यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. पण, अद्याप तरी भारतातील मान्यवरांना आमंत्रण आलेले नाही. यापूर्वी २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला सार्क देशांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी हजेरी लागली होती.

इम्रान खान यांचा विजय

पाकिस्तामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तेहरिक – ए – इन्साफ पक्षांनं ११५ जागी विजय मिळवला आहे. पण, बहुमतापासून मात्र पक्ष अद्याप लांब आहे. त्यासाठी सध्या छोट्या पक्षांशी बोलणी सुरू आहेत. इम्रान खान यांच्या तेहरिक – ए – इन्साफ पक्षाला लष्कराचा पाठिंबा आहे. दरम्यान निकालानंतर विरोधकांनी इम्रान खान यांच्या विजयावर शंका उपस्थित केल्या आहेत.

- Advertisement -

भारताकडे मैत्रिचा हात

निकालानंतर इम्रान खान यांनी निकालानंतर पाकिस्तानी जनतेचे आभार मानले. याचवेळी त्यांनी भारताकडे देखील मैत्रिचा हात पुढे केला. भारताने एक पाऊल पुढे टाकल्याल आम्ही दोन पावले पुढे येऊ असे इम्रान खान म्हणाले. पण पाकिस्तानातील लष्कराचा वरचष्मा पाहता भारत – पाक संबंध सुधारतील का? हे येणारा काळच ठरवेल.

 

वाचा – पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -