घरदेश-विदेशGail Omvedt : डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

Gail Omvedt : डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

Subscribe

उद्या सकाळी 10 वाजता डॉ. गेल ऑम्वहेट यांच्या पार्थिवावर कासेगावला क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालं आहे. वृद्धापकाळानं वयाच्या ८१ व्या वर्षी गेल ऑम्व्हेट यांनी अखेरचा श्वास घेतला. स्त्री-मुक्ती, आदिवासी चळवळीत त्यांची खूप मोठं योगदान दिलं असून महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी समाजामध्ये महत्वपूर्ण कार्य केलं . इतकंच नाही तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखली लक्षणीय कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाचे खोलवर अभ्यासकरुन त्यांनी समाज कार्यात अतुलनीय योगदान दिले. समाजासमोर महिलांचे प्रश्न ,समस्या  यांसारखे अनेक विचार त्यांनी पुढे मांडले.(gail omvedt dr gail passed away)उद्या सकाळी 10 वाजता डॉ. गेल ऑम्वहेट यांच्या पार्थिवावर कासेगावला क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.सचिन माळी यांनी फेसबुकवर डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या कार्याबद्दल संपुर्ण माहिती दिली आहे.

- Advertisement -

डॉ. गेल या अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्रि-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. आणि एमडी चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर या वादळाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आणि त्यांचा वादळी प्रवास सुरु झाला. प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. डॉ गेल आणि डॉ भारत यांनी आपल्या निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्री जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिला.
अफाट वाचनशक्ती, आणि पायाला भिंगरी बांधून फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल या संपूर्ण भारतभर फिरत आणि लिहीत राहिल्या. वेगवेगळ्या चळवळीत पुढाकारात आणि सहभागात राहिल्या आणि चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून भारतभर मांडणी करू लागल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. तत्कालीन खानापूर जि. सांगली तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच पुढाकारात राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या त्या वर्षभरा पूर्वीपर्यंत पुढाकारात आणि आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या आहेत.
डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले- आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वास मध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे. FAO, UNDP, NOVIB च्या सल्लागार राहिल्या आहेत. ICSSR च्या वतीने भक्ती या विषयावर संशोधन केले आहे. दि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली या प्रतिष्ठित अंकामध्ये व द हिंदू या देशभरात जात असलेल्या इंग्रजी वर्तमान पत्रामध्ये यांचे विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत. द हिंदू यामधील लेख वाचून विरप्पन यांनी सुद्धा पत्र पाठवून कौतुक केले आहे.

सचिन माळी

- Advertisement -

हे हि वाचा – Corona Vaccination Children: ‘या’ आजाराने ग्रस्त मुलांना मिळणार लसीकरणाकरिता प्राधान्य

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -