घरताज्या घडामोडीसंतापजनक! महिलेवर गँगरेप, पुतण्यालाही जबरदस्ती करायला लावले अत्याचार Video व्हायरल

संतापजनक! महिलेवर गँगरेप, पुतण्यालाही जबरदस्ती करायला लावले अत्याचार Video व्हायरल

Subscribe

राजस्थानमधील अलवरमध्ये सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. अलवरमध्ये एका ४२ वर्षीय महिलेला पुतण्यासह ओलीस ठेवून तीच्यावर बलात्कार करण्यात आला. आणि या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल करण्यात आला. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील तिजारा भागात ही घटना घडली आहे. आपल्या भावाला पैसे देऊन पीडित महिला आपल्या पुतण्यासह गावी परत येत होती.

यावेली ६-७ लोकांनी महिलेला अडवले. त्यानंतर एक एक करून सामूहिक अत्याचार केला. या नराधमाने त्या महिलेच्या पुतणाल्याही बांधून ठेवले. या अत्याचाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. आपल्या कृत्याची कुठे वाच्यात होऊ नये म्हणून या पीडितेच्या पुतण्याचाही व्हिडिओ तयार केला.

- Advertisement -

१७ सप्टेंबरला महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३ आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी धूता उर्फ आसम आणि सहुदला बेड्या ठोकल्या आहे. पीडितेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली होती. पीडितेनं जबाब दिला की, भावाला पैसे देऊन परत घरी येत असताना या टोळक्याने जबरदस्तीने अत्याचार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला पुतण्यासह दुचारीवरून हरियाणा येथील कंसाली गावात आपल्या नातेवाईकाचे दहा हजार रुपये देऊन गावाकडे परतत होती. वाटेत तिजारा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात डोंगराचा भाग येतो. या भागातून जात असताना  तलवार, कुऱ्हाडीसह  तरुणांनी जबरदस्तीने त्यांना थांबवले. पुतण्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचे हात पाय बांधून ठेवले. त्यानंतर या टोळक्याने जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केला.

- Advertisement -

हे ही वाचा – देशातील हजारो शाळांची होणार विक्री, अनेक समुह शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडण्याची तयारीत!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -