घरताज्या घडामोडीबिपीन रावत यांची भारताच्या पहिल्या 'चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ'पदावर निवड

बिपीन रावत यांची भारताच्या पहिल्या ‘चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदावर निवड

Subscribe

भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांची तीनही सैन्यदलात समन्वय साधण्यासाठी ‘चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदावर निवड करण्यात आली आहे. बिपीन रावत यांनी लष्कर प्रमुख पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. त्यांचा राजीनामा येण्याआधीच त्यांची ‘चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ म्हणून निवड घोषित करण्यात आली आहे. चिफ ऑफ डिफेन्स होणारे रावत हे पहिलेच लष्कर प्रमुख आहेत. सीडीएस हे पद सरकार आणि भारताचे तीनही सैन्यदल यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात चिफ ऑफ डिफेन्स पद निर्माण करणार असल्याचे सुतोवाच केले होते. मोदी म्हणाले होती की, गेल्या अनेक वर्षांपासून तीनही सैन्य दलात समन्वय राखण्यासाठी एका पदाची निर्मिती केली जावी, अशी मागणी होत होती. १९९९ कारगील युद्धानंतर ज्या समितीने युद्धाचा अभ्यास केला होता, त्या समितीनेच अशी सूचना केली होती.

- Advertisement -

२४ डिसेंबर रोजी सरकारने या पदाची घोषणा केली होती. त्यानंतर या पदाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये देखील निश्चित करण्यात आले होते. लष्कर, नौदल किंवा हवाई दलातील कोणताही फोर स्टार अधिकारी हे पद ग्रहण करु शकतो, अशी तरतदू ठेवण्यात आली आहे. तसेच तीनही दलापैकी ६५ वयाच्या आत असलेला अधिकारीच हे पद घेण्यासाठी ग्राह्य ठरु शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -