घरदेश-विदेशजर्मनीच्या लुफ्तांसा एअरलाइन्सची आज 800 विमान उड्डाणे रद्द; वेतन वाढीसाठी वैमानिकांचा संप

जर्मनीच्या लुफ्तांसा एअरलाइन्सची आज 800 विमान उड्डाणे रद्द; वेतन वाढीसाठी वैमानिकांचा संप

Subscribe

जर्मनीतील लुफ्तांसा एअरलाइन्सच्या वैमानिकांनी एका दिवसाचा संप पुकारण्याची घोषणा केली आणि त्यामुळे विमानांची उड्डाणे त्यानंतर ही उड्डाणे रद्द करावी लागली.

जर्मनीच्या(germany) लुफ्तांसा एअरलाइन्सने(lufthansa airlines) आज तेथील 800 विमान उड्डाणे रद्द केली आहेत. सुमारे 130,000 प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.  जर्मनीतील लुफ्तांसा एअरलाइन्सच्या वैमानिकांनी एका दिवसाचा संप पुकारण्याची घोषणा केली आणि त्यामुळे विमानांची उड्डाणे त्यानंतर ही उड्डाणे रद्द करावी लागली.

हे ही वाचा – भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमध्ये कोणताही बिघड नाही; बोईंग इंडियाचे स्पष्टीकरण

- Advertisement -

याच दरम्यान काल म्हणजेच गुरुवारी लुफ्तांसा एअरलाइन्सने सांगितले की, या संपामुळे(germany lufthansa airlines strike) शुक्रवारी त्यांच्या सर्वात मोठ्या दोन हब म्हणजेच फ्रँकफर्ट आणि म्युनिक येथून सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यात सर्व प्रवासी आणि मालवाहू विमानांचा समावेश आहे. यासंदर्भांत लुफ्थांसाने सांगितले की, आज शुक्रवारी सुमारे 800 विमानांची उड्डाणे रद्द होणार करण्यात येत आहेत. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. त्यात प्रामुख्याने उन्हाळी सुट्ट्या संपवून परत येणाऱ्याप्रवाशांना याचा त्रास अधिक होणार आहे.पण या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या संपामुळे एअरलाईन्सच्या बजेटवर कोणताही परिणाम होणार नाही.

- Advertisement -

विशेष म्हणजे, लुफ्तांसा सांगितले की कंपनीने 900 युरोची म्हणजेच 900 अमेरिकी डॉलरची पगार वाढ करण्याची मागणी केली होती. वरिष्ठ वैमानिकांसाठी 5% तर नव्याने सुरु झालेल्या वैमानिकांसाठी 18% वाढ करण्यात आली. या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी ताशीव मागणी वैमानिकांनी आहे.

हे ही वाचा – आपल्यात माणुसकी उरली आहे का? बिल्किस बानो प्रकरणाबाबत शबाना आझमी संतप्त

वैमानिकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?

1) युनियनने यावर्षी 5.5 टक्के पगार वाढीची मागणी केली होती आणि स्वयंचलित आणि युनियनने यावर्षी 5.5 टक्के पगार वाढीची मागणी केली आहे.

2) वैमानिक देखील नवीन वेतन आणि रजा संदर्भांतील योग्य आराखडा तयार व्हावा याची मागणी करत आहेत.

हे ही वाचा –  महासागर आणि आव्हाने अनंत मात्र भारताचे उत्तर ‘विक्रांत’ – पंतप्रधान मोदी

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -