घरदेश-विदेशभारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमध्ये कोणताही बिघड नाही; बोईंग इंडियाचे स्पष्टीकरण

भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमध्ये कोणताही बिघड नाही; बोईंग इंडियाचे स्पष्टीकरण

Subscribe

अमेरिकेन सैन्य दलातील चिनूक CH-47 हेलिकॉप्टरमधील इंजिनला आग लागण्याचा धोक्यामुळे अमेरिकेत या हेलिकॉप्टरचा वापर थांबवण्यात आला. यानंतर आता भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यातील चिनूक CH-47 हेलिकॉप्टर सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले, या प्रश्नांवर आता बोईंग इंडियाने स्पष्टीकरण दिेले आहे. बोईंग इंडियाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले की, भारतीय वायुसेनेत वापरण्यात येणारी चिनूक हेलिकॉप्टर्स पूर्णपणे सुरक्षित असून आणि त्यात कोणताही बिघाड नाही.

बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते यांनी एका विशेष मुलाखतीत म्हटले की, अमेरिकेत चिनूक CH-47 हेलिकॉप्टरमधील इंजिनला आग लागण्याचा घटनांबाबत माहिती घेतल्यानंतर भारतीय वायुसेनेने आमच्या अभियंत्यांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की, भारतीय सैन्याने चालवलेल्या हेलिकॉप्टरवर कोणताही परिणाम झाला नाही.

- Advertisement -

अमेरिकन मीडियातील वृत्तानंतर, भारतीय वायुसेनेने बुधवारी अमेरिकन सुरक्षा दलाच्या बोईंग चिनूक हेलिकॉप्टरच्या संपूर्ण ताफ्याच्या ग्राउंडिंगच्या कारणांबद्दल तपशील मागवला आहे. विशेष म्हणजे या घटनांनंतर आता अमेरिकन लष्करातील चिनूक हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफा अमेरिकन लष्कराने थांबवला आहे. चिनूकच्या इंजिनला आग लागण्याच्या घटनांबाबत लष्कर चिंतेत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन सुरक्षा दलाच्या मटेरिअल कमांडने 70 हून अधिक हेलिकॉप्टरची तपासणी करून त्यांना ताफ्यातून काढून टाकले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर भारतीय हवाई दलाने अमेरिकन संरक्षण उत्पादक कंपनी बोईंगकडून अमेरिकन सैन्याच्या चिनूक हेलिकॉप्टरच्या संपूर्ण ताफ्याला बंद करण्याच्या कारणांबद्दल तपशील मागितला होता.

भारतीय हवाई दल बोईंग-निर्मित 15 चिनूक हेलिकॉप्टरचा ताफा चालवते, ही विमानं अमेरिकेकडून विकत घेतली गेली होती आणि मार्च 2019 मध्ये ती भारती सेना दलात समाविष्ट करण्यात आली. भारतीय हवाई दलाचे चिनूक हेलिकॉप्टर फ्लीट अजूनही कार्यरत आहे. इंजिनला आग लागल्याने यूएस आर्मीकडून चिनूक CH-47 हेलिकॉप्टरच्या संपूर्ण ताफ्याला स्थगिती देण्याच्या कारणांचा तपशील भारताने मागवला आहे. त्यामुळे अमेरिका यावर काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


आपल्यात माणुसकी उरली आहे का? बिल्किस बानो प्रकरणाबाबत शबाना आझमी संतप्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -