घरदेश-विदेशप्रियकरासोबत जाण्यासाठी हवे होते पैसे, तिनं केलं असं काही, पोलिसांनाही बसला धक्का!

प्रियकरासोबत जाण्यासाठी हवे होते पैसे, तिनं केलं असं काही, पोलिसांनाही बसला धक्का!

Subscribe

चित्रपट किंवा टीव्हीवर क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचा प्रेक्षकांवर परिणाम होत नाही, असा दावा या गोष्टी बनवणाऱ्या तथाकथित क्रिएटिव्ह लोकांकडून कायम केला जातो. मात्र, तसा तो होतो हे अनेक उदाहरणांवरून दिसून आलेलं आहे. नुकता उत्तर प्रदेशच्या इटाह जिल्ह्यामध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे या घटनेचा तपास करणारे पोलीस देखील अवाक् झाले. इटाह जिल्ह्याच्या नागला भाजना गावामधला हा प्रकार आहे. या सगळ्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी काही प्रमाणात लावला जरी असला, तरी ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या, ते अजूनही पोलिसांना आणि एका १९ वर्षीय मुलीच्या नातेवाईकांना धक्का बसवण्यासाठी पुरेसं होतं!

तर झालं असं की…

नागला भाजना गावातल्या एका घरातून मईहारा पोलीस स्थानकात एक तक्रार नोंदवण्यात आली. ही तक्रार होती घरातल्या १९ वर्षीय मुलीच्या अपहरणाची. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार या १९ वर्षीय मुलीचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांकडून १ कोटींची मागणी खंडणी म्हणून केली जात आहे. आपल्या मुलीच्या काळजीपोटी हे कुटुंबीय १ कोटी द्यायला देखील तयार झाले. पण अपहरणकर्त्यांविषयी खात्री नसल्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घ्यायचा निर्णय घेतला.

- Advertisement -

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर…

या सर्व प्रकरणात वेगवेगळे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू लागले. अपहरणकर्ता हरियाणवी भाषेमध्ये बोलत असल्याचा पहिला धागा पोलिसांना मिळाला. पण एक गोष्ट पोलिसांना खटकत होती. हा अपहरणकर्ता अनेक वेळा घरच्यांना फोन करत होता. सामान्यपणे अपहरणकर्ते फोन कॉलवर फार वेळ बोलत नाहीत. पण इथे मात्र खूप वेळ फोनवर बोलणं होत होतं. किती पैसे हवेत, किती देता येतील यावर बार्गेनिंग केलं जात होतं.

इथे पोलिसांना संशय आला…

अपहरणकर्ता सदर मुलीच्याच फोनचा वापर करून फोन करत होता. म्हणून पोलिसांनी या फोनचं लोकेशन आणि इतर माहिती ट्रेस करायला सुरुवात केली. फोनचं लोकेशन त्यांच्या घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असल्याचं समजलं. आता छापा टाकायची तयारी झाली. ठरल्यानुसार छापा टाकलाही गेला.

- Advertisement -

समोर आलेलं सत्य धक्कादायक होतं…

छाप्याच्या ठिकाणी फक्त मुलगीच सापडली. तिच्यासोबत असणारी व्यक्ती तिथून पळून गेली होती. नक्की काय घडलं, याचा तपास केल्यानंतर मुलीनं सांगायला सुरुवात केली. तिचे त्यांच्या घराच्याच शेजारी राहात असलेल्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. पण त्याला तिच्या घरच्यांचा विरोध होता. म्हणून तिने पळून जाण्याचा प्लॅन केला. पण त्यासाठी पैसे हवे होते. आपल्या घरच्यांनी १ कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक शाळा सुरु करण्याची योजना आखल्याचं तिला माहिती होतं.

झालं, तिनं स्वत:च्याच किडनॅपिंगचा डाव आखला. प्रियकरासोबत घरापासून जवळच असलेल्या एका ठिकाणी लपून तिनं १ कोटींच्या खंडणीचा प्लॅन केला. स्वत:च्याच फोनवरून अपहरणकर्त्याच्या आवाजात बोलून तिनं खंडणी मागायला सुरुवात केली. पण तिथेच ती फसली. पोलिसांना संशय आला, आणि त्यांनी छापा टाकून या सगळ्या प्रकाराचा भांडाफोड केला. तिचा प्रियकर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पण पोलीस आता त्याच्या मागावर असून या मुलीला ताब्यात ठेवण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -