घरदेश-विदेशकेंद्र सरकारने पीएफवरील व्याज केले कमी

केंद्र सरकारने पीएफवरील व्याज केले कमी

Subscribe

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या (GPF) व्याजदरात कपात केली असून १० बेसिस पॉईंटची कपात केल्यानंतर या फंडातील जमा रकमेवर ८ टक्क्यांऐवजी ७.९ टक्के व्याज मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जोरदार धक्का दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या (GPF) व्याजदरात कपात केली असून १० बेसिस पॉईंटची कपात केल्यानंतर या फंडातील जमा रकमेवर ८ टक्क्यांऐवजी ७.९ टक्के व्याज मिळणार आहे. हे नवीन व्याजदर १ जुलैपासून लागू झाले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जीपीएफवरील व्याजदरात कपात करण्यात येत असल्याची माहिती दिली. जीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात १० बेसिस पॉईंटची कपात केली आहे. त्यामुळे १ जुलैपासून ७.९ टक्के व्याज मिळणार आहे, असे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या तीन तिमाहीपासून या फंडावर ८ टक्के व्याज मिळत होता.

‘या’ कर्मचाऱ्यांना झटका 

  • जनरल प्रॉव्हिडंट फंड (सेंट्रल सर्व्हिसेस)
  • कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड (इंडिया)
  • स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड
  • इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड
  • इंडियन ऑर्डनन्स फॅक्ट्रीज वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड
  • जनरल प्रॉव्हिडंट फंड (डिफेन्स सर्व्हिसेस)
  • डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड
  • आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड
  • इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड

हेही वाचा –

कर्नाटकातील ‘त्या’ बंडखोर आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा – सुप्रीम कोर्ट

- Advertisement -

सेनेच्या विराट मोर्चाला सुरुवात; उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांची उपस्थिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -