घरमुंबईसेनेच्या विराट मोर्चाला सुरुवात; उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांची उपस्थिती

सेनेच्या विराट मोर्चाला सुरुवात; उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांची उपस्थिती

Subscribe

शिवसेनेच्या विराट मोर्चाला मुंबईतील बीकेसीमध्ये सुरुवात झाली असून शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

शिवसेनेने पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढला आहे. मुंबईतील बीकेसीतून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित झाले आहेत. मोर्चेसाठी राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते आले आहेत. याशिवाय राज्यभरातील शेतकरी देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. मोर्चेमध्ये प्रचंड गर्दी जमा झाली आहे. पीक वीमा शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी वैतागला आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट तर दुसरीकडे पीक विमा कंपन्यांकडून होणारा विश्वासघात यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने हा पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मुंबईत मोठा मोर्चा काढला आहे. या मोर्चेत शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, रामदार कदम, दीपक सावंत, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे इत्यादींचा समावेश आहे.

शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका – विरोधक

दरम्यान, शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीकेचा सूर दिला आहे. शिवसेना सत्तेत असूनही मोर्चा काढत आहे, ही मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून व्यक्त केले जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवुार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अशाप्रकारचे आंदोलन करत आहे. यातून शिवसेना शेतकऱ्यांचा विश्वात घात करत असल्याचे विरोधक म्हणत आहेत. याशिवाय तुम्ही सत्तेत असून सत्तेतील मित्र पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसतात. त्यामुळे तुम्ही सरकारला सांगायला हवे, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. यापुर्वी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ही शिवसेनेची ‘स्टंटबाजी’ असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा – ‘पुनर्विकासासाठी ठोस कायदा करा’; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -