घरमहाराष्ट्रपुण्यात भटक्या कुत्रीला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

पुण्यात भटक्या कुत्रीला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

Subscribe

कुत्रीला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक करण्यात आले

सगळ्याच ठिकाणी अनेक भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याचे बघायला मिळते. मात्र पुण्यात एक वेगळीच घटना घटल्याचे समोर आले आहे. पुण्यातील वाकडमधील शंकर कलाटे नगर येथे मंगळवारी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

रस्त्यावरील एका भटक्या कुत्रीला मारहाण केल्याने त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये रस्त्यावरील भटक्या कुत्रीला बेदम मारहाण केल्यानंतर ती कुत्री जखमी झाली. त्यानंतर त्या कुत्रीला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता कुत्रीचा मृत्यू झाला. कुत्रीला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक करण्यात आले आहे.

- Advertisement -

वाकडमधील कलाटे नगर येथे राहणारा २३ वर्षीय रिपन सबुर याच्यावर ३२ वर्षीय प्राजक्ता कुणाल सिंग यांनी तक्रार केली असता त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

अशी घडली घटना

कलाटेनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर भटकी कुत्री फिरत होती. या कुत्रीला रिपन याने बेदम मारहाण केल्याने ती जखमी झाली. त्यावेळी प्राजक्ता आणि त्यांच्या मित्रांनी जखमी कुत्रीला औंध येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्या कुत्रीचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात भादवी कलम ४२९ प्राणांचे छळ प्रतिबंध अधि. कलम (१) (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -